उत्तमराव भताने यांचा शुक्रवारी दशक्रियाविधी 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील स्व. उत्तमराव केरु भताने यांचा दशक्रियाविधी शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता माका येथील संत वामनभाऊ मंदिर येथे होणार आहे. दशक्रियाविधीनिमित्त हभप भगवान महाराज मचे (हरेश्वर संस्थान) यांच्या प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रयागाबाई उत्तमराव भताने (पत्नी), विजय उत्तमराव भताने […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. या बालदिनी विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब दळवी, दानियल दळवी, पोपट […]

सविस्तर वाचा

पाथरवाला विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २३ वर्षांनी भरला वर्ग 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाच्या सन २००२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष संंस्कार वर्ग घेऊन स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिपावली सुट्टीचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले वर्गमित्र माजी विद्यार्थी – विद्यार्थींनी एकत्र येवून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २३ वर्षानंतर एकमेकांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक […]

सविस्तर वाचा

कै. शंकर बाबुराव लाड यांचा रविवारी दशक्रिया विधी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शंकर बाबुराव लाड यांचा दशक्रिया विधी रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधिनिमित्त बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात हभप घन:श्याम महाराज शिंदे (शिरापूरकर) यांचे ८ ते १० या वेळेत प्रवचन होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छबुबाई […]

सविस्तर वाचा

भारत कांबळे सर यांच्या कार्तिकी वारीला सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील माध्यमिक शिक्षक भारत कांबळे यांच्या सालाबादप्रमाणे कार्तिकी वारीला सुरुवात करण्यात आली आहे. भारत कांबळे मागील १५ वर्षांपासून दिवाळीची सुट्टी लागली की पंढरपूरची कार्तिक वारी नियमितपणे करतात. भारत कांबळे सर श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे खालसा येथे २७ वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ यांची प्रेरणा घेऊन […]

सविस्तर वाचा

अकरा हजार दिव्यांनी साजरा झाला शिर्डीतील साईंचा दीपोत्सव

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डीच्या साईबाबांनी पाण्याने पणत्या पेटवून दिवाळी साजरी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार व साक्षात्काराची आठवण म्हणून भाविकांनी साईंच्या शिर्डी येथील व्दारकामाईसमोर अकरा हजार दिवे पेटवून साई मेरे भगवान हा संदेश देत “देव दीपोत्सव” साजरा केला. शिर्डीत दीपावलीच्या पुर्वसंध्येला हा दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा असून यंदाही भावीकांनी यात सहभाग घेत हा दीपोत्सव अगदी आनंदात […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी सागर मनोहर बनसोडे सर तर उपाध्यक्षपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते तर प्रास्ताविक अशोक मुंगसे यांनी केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, […]

सविस्तर वाचा

देडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे तर व्हा. चेअरमनपदी सुनिता मुंगसे 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी सागर बनसोडे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी मांडली. त्यास संचालक कचरू तांबे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन सुनीता मुंगसे यांच्या नावाची सूचना महेश कदम यांनी […]

सविस्तर वाचा

नामवंत मल्लांच्या कुस्त्याच्या हगाम्याने श्री बालाजी यात्रोत्सवाची सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने शांतीब्रह्म , गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली होती. दररोज नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. तसेच विजयादशमी दसरा निमित्त […]

सविस्तर वाचा

वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभागृहात सालाबादप्रमाणे वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन उद्या दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हभप भागचंद महाराज पाठक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन […]

सविस्तर वाचा