बालाजी देडगाव येथे उद्या हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बालाजी मंदिर सभामंडपात उद्या रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे […]

सविस्तर वाचा

कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, हळदी कुंकू समारंभ उत्साहात  

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयहरी सोन्याबापू कुटे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, अरुण वांढेकर आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे […]

सविस्तर वाचा

देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, हळदी कुंकू समारंभ उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण व मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘न्यू होम मिनिस्टर’कार्यक्रमाचा जल्लोष

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी ‘हळदी कुंकू’आणि ‘न्यू होम मिनिस्टर’खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या भव्य दिव्य कार्यक्रमाला सलाबतपुर व परिसरातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने […]

सविस्तर वाचा

सहाय्यक विक्रीकर आयुक्त पूजा शिंदे यांचे तक्षशिलाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शालेय जिवनापासुनच दररोज वृत्तपत्र वाचण्याची सवय लावा, शालेय पाठ्यपुस्तके हा स्पर्धा परीक्षांचा पाया आहे. हा पाया पक्का करा. जिद्द चिकाटी, सातत्य आणि संयम ठेउन अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते, असे प्रतिपादन सहाय्यक विक्रीकर आयुक्त पुजा शिंदे यांनी केले. तक्षशिला ज्युनिअर काॕलेज मध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ […]

सविस्तर वाचा

मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर: प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि.१४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२६ निमित्त मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून एकता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावेडी, अहिल्यानगरचे […]

सविस्तर वाचा

तक्षशिला विद्यालयात ‘वाण सुवासिनीचे’ सोहळा उत्साहात  

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-अलीकडच्या काळात प्रत्येक घरात मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे. अनेकदा लहान मुले जेवण करत नाहीत म्हणून माता त्यांच्या हातात मोबाईल देतात. यामुळे मुलांना आपण कोणत्या चवीचे अन्न खातो याचे भान राहत नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर त्यांना जेवताना मोबाईलपासून दूर ठेवा,” असे प्रतिपादन […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये”मकर संक्रातीचा उत्सव” हळदी कुंकवाच्या साथीने न्यू होम मिनिस्टर च्या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारे शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त सलाबतपुर परिसरामध्ये प्रथमच प्रसिद्ध निवेदक गणेश भाऊ हापसे प्रस्तुत न्यू […]

सविस्तर वाचा

चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये”मकर संक्रातीचा उत्सव” हळदी कुंकवाच्या साथीने न्यू होम मिनिस्टर च्या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित गुणवत्ता,संस्कार व संस्कृती जपणारे शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये खास मकर संक्रांतीनिमित्त सलाबतपुर परिसरामध्ये प्रथमच प्रसिद्ध निवेदक गणेश भाऊ हापसे प्रस्तुत न्यू […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबिराचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तंत्र प्रशिक्षक पंकज विनायक डहाळे यांच्या संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील महादेव मंदिर देडगाव येथे मंगळवारी २० जानेवारी पासून रोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या कालावधीमध्ये या संपूर्ण आरोग्य प्राप्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २७ जानेवारी या कालावधीत या शिबिराचे […]

सविस्तर वाचा