श्री. संत माऊली मल्टीस्टेटतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. संत माऊली मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड (तिसगाव अर्बन )यांच्याकडून शाळेतील गरीब ,होतकरू, गुणवंत शाळेत प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना दप्तरबॅग व राष्ट्रगीत ,भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते […]

सविस्तर वाचा

तेलकुडगावात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ग्रामपंचायत सचिवालयासमोर ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच लताताई सतिशराव काळे व उपसरपंच सुरेखा शरद काळे व ग्रामसेवक बी.बी.काळे भाऊसाहेब, तलाठी मलदोडे भाऊसाहेब यांनी तिरंगा ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. स्वांतत्र्यदिनाच्या निमित्त जि.प.प्रा.शाळा काळे वस्ती शाळेस ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांना १,२५,००० रू.इंटरॅक्टिव्ह पॅनल […]

सविस्तर वाचा

माका महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भानुदास चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र दिनानिमित्त सानिका सांगळे, प्रियांका भानगुडे व शितल खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सविस्तर वाचा

देशातील एक लाख तरुणांनी त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं: पंतप्रधान

जनशक्ती (वृत्तसेवा)- देशभरातून १ लाख तरुणांनी पुढे येऊन त्यांच्या आवडीच्या पक्षात कार्यरत व्हावं, जेणेकरून नवीन पिढी राजकारणात येईल व त्याअनुषंगाने नवे विचारही राजकीय व्यवस्थेत दाखल होतील, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी देशाचा विकास, कायदे आणि नियमांतील बदल यावर भाष्य केलं. भारताच्या ७८ […]

सविस्तर वाचा

श्री संत माऊली मल्टीस्टेटतर्फे उद्या देडगावात शालेय साहित्याचे वाटप

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- श्री संत माऊली मल्टीस्टेटतर्फे उद्या १५ ऑगस्टनिमित्त देडगाव येथील प्राथमिक शाळेत तसेच माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सुनिल शिरसाठ यांनी दिली. श्री संत माऊली मल्टीस्टेटच्या सातव्या शाखेचे १ सप्टेंबर रोजी देडगाव येथे उद्घाटन होणार आहे. संतांची शिकवण व त्यांच्या […]

सविस्तर वाचा

सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच एस.टी.महामंडळ नफ्यात! 18 विभागांनी कमावला नफा

जनशक्ती (वृत्तसेवा)- गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील, अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाममात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै 2024 मध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १३१ […]

सविस्तर वाचा

लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी महाराष्ट्रातून 123 मान्यवर उपस्थित राहणार 

जनशक्ती (वृत्तसेवा)- 15 ऑगस्ट 2024 रोजी देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील. आणि त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे या ऐतिहासिक स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील. या निमित्ताने, नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन 2024 च्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 123 मान्यवर […]

सविस्तर वाचा

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? या पध्दतीने करा चेक 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार आहेत. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार, हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नंबर टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात […]

सविस्तर वाचा

मंत्री, आमदारांनी विचार करुन बोला; मुख्यमंत्र्यांनी सुनावले 

जनशक्ती (वृत्तसेवा)- आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया देत आमदारांना दम दिला आहे. प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. आज महाराष्ट्र […]

सविस्तर वाचा

दत्तात्रय भिंगारे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शिवस्वराज बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांना जाहीर झाला असून ११ ऑगस्ट २०२४ ला शिर्डी येथे हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे सचिव ताईसाहेब वाघमारे यांनी सांगितले. नेवासा तालुक्यातील कौठा येथील पत्रकार दत्तात्रय भिंगारे यांनी गेल्या ३० वर्षापासून पत्रकारितेत काम करत आहेत. […]

सविस्तर वाचा