माका महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भानुदास चोपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र दिनानिमित्त सानिका सांगळे, प्रियांका भानगुडे व शितल खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सविस्तर वाचा