आगामी दोन दिवस, काय आहे पावसाचा अंदाज? घ्या जाणून 

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रात आज आणि उद्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. आज एखाद्या तालुक्यात पाऊस झाला तर उद्या दुसऱ्या एखाद्या तालुक्यात पाऊस पडेल, असं पंजाबराव डख यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबराव डख यांनी वर्तवेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पाऊस विश्रांती घेणार आहे. […]

सविस्तर वाचा

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, रात्री अडीच वाजता सलाईन लावले

जनशक्ती (वृत्तसेवा)- मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी 8 जूनला आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आंतरवाली सराटीत तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची […]

सविस्तर वाचा

नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कामाला धडाकेबाज सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कामाची कार्यतत्परता दाखवत नेवासा तालुक्यातील पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या पीक व फळबागांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नेवासा तहसीलदारांना दिले आहे. दोन दिवसापूर्वी खासदारपदी निवड झाली, सत्कार समारंभ शुभेच्छांचा ओघ चालू असताना शेतकरी वर्गावर आलेल्या संकटाची जाण ठेवून सत्कार समारंभ बाजूला करत प्रथम त्या […]

सविस्तर वाचा

आंदोलन दडपण्यासाठीच उपोषणाला परवानगी नाकारली; मनोज जरांगे यांचा आरोप 

जनशक्ती, वृत्तसेवा- आंतरवाली सराटीतील काही ग्रामस्थांनी माझ्या उपोषणासाठी गावात परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याच्याआधारे पोलिसांनी माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली. हे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. गेल्या 10 महिन्यांमध्ये हे निवेदन का दिले नाही? निवेदनाच्या आधारावर माझ्या आमरण उपोषणाला […]

सविस्तर वाचा

कृष्णानंद कालिदास महाराजांना शनिरत्न पुरस्कार प्रदान 

विजय खंडागळे ……………………………….. सोनई (प्रतिनिधी)- शनिशिंगणापूर ता नेवासा येथे श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट शनिशिंगणापूरच्या वतीने देवस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव बानकर (भाऊ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी श्री श्री 1008 परमहंस कृष्णानंद कालिदास महाराज हरियाणा यांना शनिरत्न पुरस्कार श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व समाधान महाराज शर्मा, महंत सुनीलगिरीजी […]

सविस्तर वाचा

फडणवीसांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णयावर अमित शहा यांनी दिला ‘हा’ आदेश

जनशक्ती, वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती मी त्यांच्याकडे करणार आहे, […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचं महान दैवत, 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांनी मराठी साम्राज्याचा पाया रोवला, म्हणून रायगडमध्ये त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. दरवर्षी 6 जून या दिवशी सर्व शासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिन म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा […]

सविस्तर वाचा

कोण होणार खासदार? निकाल काही तासांवर

जनशक्ती (वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्रातील 48 जागांवर कोण बाजी मारणार उद्या (ता.4) स्पष्ट होईल. नगर जिल्ह्यातील नगर व शिर्डी लोकसभेच्या खासदारपदी कोणाची वर्णी लागते, हे उद्या स्पष्ट होईल. नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी नगर एमआयडीसी वखार महामंडळ येथे सकाळी ८ वाजता मतमाेजणी सुरू हाेणार आहे. […]

सविस्तर वाचा

चोंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

जनशक्ती, वृत्तसेवा- लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी ): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे होते. तर जयंती सोहळ्याचे प्रास्ताविक […]

सविस्तर वाचा