मॅथ जीनियस ऑलंपियाड परीक्षेत तांबे वस्ती शाळेचे घवघवीत यश 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे वस्ती शाळेने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मॅथ्स जीनियस ऑलंपियाड परीक्षा 2024-25 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.देडगाव केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत तांबे वस्ती शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी औटी आरुष गणेश यांने केंद्रात दुसरा तर शाळेत पहिला क्रमांक पटकावला. त्याने १०० पैकी 84 गुण मिळवले. शाळेतील 19 पैकी 17 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले. तर 12 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शाळेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- औटी आरुष गणेश, खळेकर ओम मनोज, पिसे गौरव सुनील, तांबे दिव्या सावता, तांबे नेहा सचिन या या विद्यार्थ्यांनी मेडल व प्रमाणपत्र मिळवले. तर चेडे शिवम विकास, तांबे अथर्व कैलास, तांबे अंकिता किशोर, तांबे शिवन्या शरद, तांबे ज्ञानेश्वरी विष्णू, औटी श्रेया उद्धव, तांबे समृद्धी नवनाथ, मुंगसे वैशाली कल्याण, तांबे अनंत महेंद्र, तांबे बाळकृष्ण बाबासाहेब, पवार कार्तिक संदीप, तांबे प्रांजल हरिश्चंद्र या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले. वरील सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे, उपाध्यक्ष किशोर तांबे, योगेश तांबे, कैलास तांबे, माजी अध्यक्ष अप्पासाहेब तांबे, अमोल सोपान तांबे, संकेत अशोक तांबे, लक्ष्मण मुंगसे, मिनाक्षी मुंगसे, शाळेचे मुख्याध्यापक कचरे सर, नांगरे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले.