माका येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवार दिनांक 6/4/2025 ते रविवार दिनांक 13/4/2025 या कालखंडामध्ये वै. ह भ प परम पूज्य गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या कृपाआशिर्वादाने व ह भ प शांतीब्रह भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या कृपया मार्गदर्शनाखाली व भजनी मंडळाच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
रविवार दिनांक 6/4/2025 रोजी 9 ते 12 या वेळामध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न होऊन सप्ताहास सुरुवात होत आहे. सप्ताहामध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन,9 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,4 ते 5 प्रवचन ,5 ते 6 हरिपाठ , सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन व तद्नंतर दररोज महाप्रसाद होईल.
त्यामध्ये रविवार दिनांक 6/4/2025 हभप घनश्याम महाराज शिंदे श्री क्षेत्र शिरापुर, सोमवार दिनांक 7/4/2025 ह भ प प्रताप महाराज कोलते संभाजी नगर ; मंगळवार दिनांक 8/4/2025 ह भ प नवनाथ महाराज सुराशे ; बुधवार दिनांक 9/4/2025 ह भ प सुरेशानंदजी महाराज कोळेकर ; गुरुवार दिनांक 10/4/2025 ह भ प श्रीकांत महाराज शिनगारे दहेगावकर ; शुक्रवार दिनांक 11/4/2025 ह भ प रोहीदास महाराज शास्त्री राजे धर्माजी गड हातोला ; शनिवार दिनांक 12/4/2025 ह भ प गोविंद महाराज शिंदे डाकुनिमगाव यांचे यांचे जाहीर हरी किर्तन सेवा होईल. व रविवार दिनांक 13/4/2025 रोजी सकाळी 9 ते 11 ह भ प भागवत महाराज उंबरेकर, श्री क्षेत्र वृध्देश्र्वर संस्थान यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाची महापगंत होईल .तरी यांची पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भक्तीज्ञानगंगेच्या प्रेमप्रवाहात सहभागी होऊन ज्ञानामृत व संत सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती माका भजनी मंडळ, सप्ताह कमिटी व समस्थ ग्रामस्थ माका यांच्याकडून करण्यात येत आहे.