सर्वसामान्यांना झटका! घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महागला

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- सर्वसामान्य नागरिकांना झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा फटका थेट सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. उज्वला योजनेतील ग्राहकांना देखील ही गॅस सिलेंडरची दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ केली आहे. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, या शुल्कवाढीचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलचे बाजारातील दर सध्या जैसे थेच राहतील.