बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सोनई येथील विठ्ठलजी खाडे यांच्या मातोश्री सुंदरबाई खाडे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सुंदरबाई खाडे यांचा सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग असे. त्यांच्या अंत्यविधीस मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे. सोनई येथील विठ्ठलजी खाडे, जालिंदर खाडे, रामदास खाडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
