निंबेनांदूर येथे श्री लमाण बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- निंबेनांदूर येथे श्री लमण बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निंबेनांदूर- तेलकुडगाव रोड चेके वस्ती (ता.शेवगाव) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये शुक्रवारी(ता.१८) सकाळी १० वाजता होम पूजा शनिवारी (ता.१९) सकाळी १० वाजता मूर्ती व कलश मिरवणूक सोहळा तर रविवारी (ता.२०) सकाळी १० वाजता कलश पूजन व त्यानंतर हभप शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड संस्थान) यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारभारी गोफणे ( बालाजी देडगाव) व समस्त ग्रामस्थ निंबेनांदूर यांनी केले आहे.