बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त माजी सरपंच बाजीराव मुंगसे यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी चेअरमन लक्ष्मण बनसोडे, पांडुरंग रक्ताटे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सुभाष मुंगसे, चेअरमन सागर बनसोडे, गणेश औटी, कडुबाळ ससाणे, बन्सीभाऊ मुंगसे, निवृत्ती तांबे, पत्रकार इंनुस पठाण, संपत ससाणे, हिरामण फुलारी, अरुण वांढेकर, भारत औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
या आनंद मेळाव्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ तसेच आपल्या स्वतःच्या शेतातील भाजीपाला तसेच विविध फळे व इतर आकर्षक वस्तूचे स्टॉल मांडले होते. या आनंद मेळाव्यात सुमारे ३५ हजार रुपयांची उलाढाल झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, पर्यवेक्षक राशीनकर सर, क्रीडा शिक्षक दसपुते सर, कोठूळे सर, सोनवणे सर, कल्हापुरे सर, फटांगरे सर , गायकवाड आर बी सर, झडे सर, कोळेकर सर , निकम सर , पंडित मॅडम, नवाळे मामा यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.



