आयुष्याच्या परिपूर्णतेसाठी परमार्थ महत्त्वाचा: हभप म्हस्के महाराज   

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आयुष्यात आपली दैनंदिन कर्म करत असतांना जिवनाच्या परिपूर्णतेसाठी परमार्थ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन हभप वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोमाता प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित किर्तनसेवेत ते बोलत होते.

गोसेवक हभप आसाराम शंकरराव मुंगसे पाटील, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ आसाराम मुंगसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, हभप वाघाडे महाराज (दत्त देवस्थान, वडाळा), माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, भागचंद महाराज पाठक ( नजिक चिंचोली), जनार्धन पाटील कदम (ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक), नारायण म्हस्के सर (ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक), सभापती अंबादास कळमकर, हभप सतीश महाराज खाटीक, हभप खाटीक टेलर, हभप ऋषी महाराज शेजूळ (पखवाज वादक), हभप अनिल महाराज गरुड (गायक), हभप तुकाराम महाराज काळे, हभप सतरकर महाराज, हभप शिंदे महाराज, हभप बापूसाहेब टिळेकर महाराज, हभप श्रीधर महाराज घाडगे, गोरख मुरकुटे साहेब, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, बबन काका भुसारी, ज्ञानेश्वर वाघाडे, पाचुंदा, बालाजी देडगाव येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी प्राचार्य शिवाजी कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बालाजी देवस्थान ट्रस्ट, बजरंग दल, बालाजी देडगाव, देवगड सेवेकरी ग्रुप बालाजी देडगाव, बालाजी टूर्स ट्रॅव्हल्स, बालाजी केटरर्स देडगाव, भजनी मंडळ, तरुण मंडळ व ग्रामस्थ बालाजी देडगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश एडके सर यांनी केले. तर बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.