जनशक्ती (वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र दिघी ते श्रीक्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रस्थान झाले आहे. सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पायी दिंडी सोहळ्यामध्ये समस्त दिघी गावातील ग्रामस्थ त्यामध्ये पुरुष, महिला, युवक ,युवती ,मोठ्या संख्येने सद्गुरु किसनगिरी बाबांचा जयघोष करत दिघीवरून देवगड देवस्थानला निघाले आहेत.दिघी गावामधून दरवर्षीच हा दिंडी सोहळा देवगड देवस्थान येथे सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जाताना पहावयास मिळतो. गेल्या काही दिवसापूर्वी दिघी गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याच्या कालखंडामध्ये देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट देऊन सप्ताह सोहळ्याचे कौतुक केले होते. त्या सोहळ्यामध्ये भगवान मारुतीरायांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम सुरू करण्याचे देवगड देवस्थानचे महंत स्वामीजी यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिघी ग्रामस्थांच्यावतीने लाखोंच्या स्वरूपात वर्गणी जमा होऊन येत्या वर्षभरामध्ये पुढील सप्ताहाच्या अगोदरच कामाला प्रारंभ करून भगवान मारुती मंदिराच्या जीर्णोद्धार करणार असल्याचे दिघी ग्रामस्थांनी सांगितले.
