बालाजी देडगावचे सुपुत्र मधुकर क्षीरसागर यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर क्षीरसागर यांना समाजात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल संत नरहरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पाटोदा यांच्यातर्फे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश पंडित यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार मधुकर क्षीरसागर यांना प्रदान करण्यात आला. मधुकर क्षीरसागर यांचा समाजासाठी व बालाजी देडगाव येथील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमासाठी व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा असतो. त्यांनी त्यांच्या समाजासाठी आतापर्यंत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुनिल महामुनी, उपाध्यक्ष गौतम पंडित, प्रकाश पारखे, अनिल धर्माधिकारी, रामानंद तपासे, प्रविण महामुनी, महेश पंडित, दत्ता पंडित, जगदीश महामुनी, अमोल महामुनी, योगेश पंडित, परशुराम पंडित, केशव पंडित, सुमनबाई क्षीरसागर, विठ्ठल क्षीरसागर, अनिता क्षीरसागर, अर्चना क्षीरसागर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.