बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित श्री संत रोहिदास महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील श्री संत रोहिदास महाराज सभागृहात आयोजित या सोहळ्यात सर्वप्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी सरपंच मच्छिंद्र कदम, हभप बाबासाहेब वांढेकर महाराज, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, रघुनाथ कुटे पुढारी, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, संभाजी काजळे, मधू देवा तांदळे, कैलासनाथ मित्र मंडळाचे अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, बहिरनाथ एडके,
महादेव मुंगसे, राजू मुंगसे टेलर, चांगदेव महाराज तांबे, जनाभाऊ मुंगसे, जय हरी मुंगसे, निवृत्ती तांबे, नारायण एडके, रामदास एडके, नागेबाबा परिवाराचे पांडुरंग एडके, हरिभाऊ एडके, ज्ञानेश्वर एडके, विठ्ठल एडके, सिताराम फुलारी, मोहन बताडे, रमेश बताडे, रवींद्र बाळासाहेब बताडे, शंकर बताडे, राजेंद्र बताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्राचा व कार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संत रोहिदास महाराज देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार इंनुस पठाण यांनी केले. तर बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


