माऊली नाही बनता आले तर माऊलींची सावली होण्याचा नक्की प्रयत्न करा- श्री प्रविण ऋषींजी महाराज साहब

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माऊली नाही बनता आले तर माऊलींची सावली होण्याचा नक्की प्रयत्न करा, असे आवाहन जैन धर्मगुरु परम पूज्य श्रध्येय उपाध्याय प्रवर श्री प्रविण ऋषींजी महाराज यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जैन धर्मगुरु परम पूज्य श्रध्येय उपाध्याय प्रवर श्री प्रविण ऋषींजी महाराज साहब व मधुर गायक परम पूज्य तीर्थेष ऋषींजी महाराज साहब यांच्या सुश्राव्य व्याख्यान व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. येथील महादेव मंदिर देडगाव येथे आयोजित या कार्यक्रमात श्री प्रविण ऋषींजी महाराज साहब यांनी उपस्थित भाविकांना अमुल्य असे ज्ञान दिले.यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे,  हभप सदाशिव महाराज पुंड, हभप बाबासाहेब महाराज वांढेकर, घोडेगाव श्री संघ सचिन देसरडा, पारसभाऊ चोरडिया, आनंद कुवर, सचिनभाऊ चोरडिया, सतीशशेठ मेहर, बाळूशेठ गुगळे, अभिजीत लुनिया, कचरूशेठ गुंदेचा, सागर गुंदेचा, बालाजी देवस्थानचे उपाध्यक्ष सुभाषशेठ चोपडा, सतीश मुथा, बाळूशेठ चोपडा, सुनील मुथा, मिरी श्री संघ संतोषभाऊ गुगळे, अनिकेत मुथ्था, संतोषशेठ गुंदेचा, बाळूशेठ कटारिया, अमोल पटवा, टाकळी ढोकेश्वर श्री संघ पोपटशेठ कटारिया, प्रवीणजी कटारिया, विलासजी कटारिया, डाॅ. भंडारी नगर, रमेशजी मुनोत नगर, शुभम गुगळे, सौरभ गुगळे, अमोल शिंगवी, विनिता चोपडा, अनिकेत मुथ्था, रमेश संचिती, कैलासनाथ मित्र मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.