शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप व मागासवर्गीय विधवा महिलांना वर्षभर मोफत पाणी वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील सर्व मागासवर्गीय कुटुंबांना मोफत पाण्याचे जार वाटप करण्यात आले तसेच मागासवर्गीय विधवा महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत आरो फिल्टर पाणी वाटप करण्याचे ठरले.

या पाण्यामुळे ग्रामस्थांचे व लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी कोलते पाटील व संजय वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील कोलते, सरपंच मनीषा संदीप कोलते, उपसरपंच सुनील कोलते, सदस्य संभाजी देवकर, गोरक्षनाथ देवकर, भाऊसाहेब मांडे, बापूसाहेब कोलते, ग्रामविकास अधिकारी थिटे मॅडम, संजय वाल्हेकर, लक्ष्मण कोलते, अनिल काळे, भानुदास कोल्हे, रामकिसन इंगळे, अमोल वाल्हेकर, अशोक कारभोळ, अशोक कोलते, सिताराम शिंदे, संजय कोलते, भागचंद कोलते, बाबासाहेब काळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.