जनशक्ती (वृत्तसेवा)- धरणग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कोणत्या सुविधा मिळाल्या नसल्याचा महत्त्वपूर्ण विषय नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विधानभवनात मांडला.
आमदार लंघे पाटील म्हणाले, नदीकाठच्या गावांसाठी रोडची सुविधा नसल्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिक नदीच्या किनाऱ्यावर अंत्यविधी करतात. अंत्यविधी वेळी अनेक मृतदेह अर्धवट जळले जातात व पाण्यामध्ये वाहून जातात, ही दुर्दैवी बाब आहे. त्यासाठी धरणग्रस्त परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी.
तसेच नेवासा तालुक्यातील अनेक रस्ते हे खराब झालेले आहेत. तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, त्यांचाही विकास होणे गरजेचे आहे, मंत्री महोदयांनी या पुनर्वसीत गावांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार लंघे पाटील यांनी केली.
