जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव येथे नवनियुक्त मुख्याध्यापकांचे उत्साहात स्वागत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने स्वतंत्र मुख्याध्यापक म्हणून आलेले श्रीमान बोरुडे सर याची नियुक्ती झाली व त्यानंतर त्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समस्त ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती, व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. एक अनुभवी व खेळाडू वृत्तीचे गुणवंत असे मुख्याध्यापक शाळेला लाभल्याबद्दल सर्वांनी मनोगतातून त्यांचे अभिनंदन केले.

नवनियुक्त मुख्याध्यापक बोरुडे सर यांचा रांगोळी फुले टाकून विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत स्वागत करण्यात आले यावेळी अनिल राजहंस सर यांनी शाळेच्या विकास कामासाठी पाच हजार रुपये प्रोत्साहन पर दिले व ह.भ.प महेश महाराज घाडगे, वकील सचिन घोडेचोर, शिवाजी पा. घोडेचोर या.पोलीस पाटील, अध्यक्ष विलास घाडगे, यांनी मुख्याध्यापक बोरुडे सरांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले

स्वागत समारंभ कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त करताना  सतिशराव काळे पाटील सरपंच यांनी जिल्हा परिषद शाळेने सेंद्रिय परस बाग तयार केली व पारस बागेचा तालुका स्तरावरती पहिला नंबर आला त्याबद्दल शाळेचे कौतुक केले व चांगले आरोग्य व निरोगी भाजीपाला मिळण्यासाठी तेलकुडगाव येथील नागरिकांनी व शेतकरी बंधूंनी आप आपल्या घरी देखील पारस बाग तयार केली पाहिजे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक व मुलभूत सुविधा मिळण्यासाठी शाळेचा विकास हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू समजुन काम केले पाहिजे असे प्रतिपादन तेलकुडगावचे सरपंच सतीशराव काळे यांनी केले. ग्रामपंचायत च्या माध्यमातून संधी मिळाल्यानंतर २०२१ ते २९२६ या काळात आपले सर्व सहकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याकडे जिल्हा परिषद शाळेला शाळा खोल्या मिळण्यासाठी एक मुखी मागणी केली व लगेच भाऊंनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या माध्यमातून शाळा खोल्यांसाठी २९ लाख रुपये मंजूर करुन दिले व तीन शाळा खोल्या बांधकाम पूर्ण झाले, त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळण्यासाठी एलईडी स्क्रीन साठी एक लाख रुपये, विद्यार्थ्यांना जेवणासाठी स्वतंत्र चार लाख रुपये किमतीचे किचन शेड, शौचालयासाठी चार लाख रुपये, तसेच शाळेच्या बैठक व्यवस्थेनुसार पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती व काही नवीन पेव्हिंग ब्लॉक दिले, असा मोठ्या प्रमाणात निधी शाळेसाठी उपलब्ध करून दिला.
यावेळी हभप महेश महाराज घाडगे, श्री.सतिशराव काळे पाटील सरपंच, श्री बालकनाथ काळे मा सरपंच, श्री संजय घोडेचोर शिवसेना संघटक, अनिल राजहंस सर, श्री शिवाजी घोडेचोर मा.पो.पाटील, दिपक साळवे साहेब शालेय समिती सदस्य, गणेश घाडगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास घाडगे, श्री.सुदामराव काळे मा.व्हा.चेअरमन, Adv. श्री.सचिन घोडेचोर, श्री.दत्तुराजे काळे पाटील, श्री संजय घाडगे, श्री सोपानराव शेंडगे, श्री.अन्नासाहेब घोडेचोर मा.अध्यक्ष शालेय समिती, श्री दिनेश म्हस्के मा.उपाध्यक्ष शालेय समिती, रमेश देशमुख सर, पत्रकार ज्ञानेश्वर फसले, प्रगतशील शेतकरी रवींद्र पा काळे, राजूकाका घाडगे, श्रीकृष्ण घाडगे, श्रीकांत घाडगे, सुधाकर माने, महेश शेटे, राजेंद्र काळे, बाबासाहेब घोडेचोर, अभिजीत घोडेचोर, शिक्षक चंद्रकांत देवढे, बाळासाहेब उभेदळ, वैशाली भोगे मॅडम, जनाबाई काळे मॅडम ,आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष लोणारे यांनी केले. उभेदळ सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.