बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील एकनाथ (बाळदेवा) विठ्ठल तांदळे (वय ११०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. बाळदेवा तांदळे यांनी अनेक वर्षे येथील श्री बालाजी मंदिरात पुजारी म्हणून सेवा केली. विविध सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. येथील बबनराव तांदळे, सुभाष तांदळे व राजेंद्र तांदळे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
