देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गोड देशभक्तीपर घोषणांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या घोषणांनी सर्व परिसर चैतन्यमय झाला. नंतर प्रमुख पाहुणे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ पाटील कुटे, प्रमुख अतिथी साहेबराव पाटील कदम, भाऊसाहेब पाटील कदम, मधुकर पाटील वांढेकर, अशोक पाटील कदम, विलास पाटील म्हस्के, विष्णू पाटील म्हस्के, नितीन पाटील कदम आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी प्रास्ताविक केले. मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील कुटे यांनी आपले विचार मांडले. महाराष्ट्र राज्य निर्मिती, त्यासाठीचे बलिदान, महाराष्ट्र राज्याचा भौगोलिक, ऐतिहासिक, शैक्षणिक व वैभवशाली इतिहास सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी ओघवत्या भाषाशैलीत सांगितला.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या मॅथ्स जिनीयस ऑलम्पियाड शिष्यवृत्ती परीक्षेत लहान गटात प्रणिती नितीन कदम हिला सुवर्ण पदक, समृद्धी रविंद्र वांढेकर हिला रौप्य पदक, रुद्र सागर वाल्हेकर याला कांस्य पदक तसेच मोठ्या गटात प्रियंका रविंद्र वांढेकर हिला सुवर्ण पदक, शर्वरी आजीनाथ वांढेकर हिला रौप्य पदक, विराट अमोल कुटे यास कांस्य पदक तसेच शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या परीक्षेत शाळेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लक्ष्मण पाटील मुंगसे सर यांनी परीक्षा मंडळातर्फे  शाळेला सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते दिले. यावेळी सर्व मान्यवर, पालक, ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका वनिता चिलका, सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांचे कौतुक करत भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर पॅट चाचणीचे पेपर पालकांना दाखवून वार्षिक निकालपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले. सर्वांनी शालेय गुणवत्ता, एकंदरीत कामकाज यावर समाधान व्यक्त करुन विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला सुभद्राबाई कदम, मदलासाबाई कदम, लताबाई ताके, अलका कदम, अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे, आदी पालक बंधु भगिनी उपस्थित होते. शाळेला गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर साहेब, विस्ताराधिकारी भागीनाथ बडे साहेब, केंद्रप्रमुख भास्कर तांबे साहेब, केंद्र मुख्याध्यापक सतिशकुमार भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.