आपल्या प्रत्येक आजाराचा उपचार राम कृष्ण हरी- गोवत्सल राधाकृष्ण महाराज

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)-  श्रीक्षेत्र देवगड देवस्थान येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल भक्ती निमित्ताने गोवत्सल जोधपुर वाले राधाकृष्ण महाराज यांच्या भागवत कथेला प्रारंभ झाला असून आजच्या तिसऱ्या दिवशीच्या भागवत कथेच्या तिसऱ्या दिवशीच्या पुष्पकच्या माध्यमातून महाराज बोलताना म्हणाले की राजा परीक्षीत यांच्या कथेतून सांगताना म्हणाले की मला कोणताही विषारी साप डसला तरी कोणत्याही औषधाचा उपयोग होणार नाही आणि होतही नाही परंतु मला कथेमध्ये कथा ऐकण्यासाठी नेऊन बसवल्यास मी व्यवस्थितपणे ठीक होईल एवढी ताकत कथेमध्ये असल्याचे हे उदाहरणाद्वारे सांगितले. समुद्राच्या पाण्याला कोणीही मोजू शकत नाही तशाच पद्धतीने कथेचे आहे कथ अथा आहे मजेत आहे अथांग सागरासारखी असल्याचे बोलताना सांगितले भगवान नारायणाने भागवत ब्रह्मदैवाला दिले व नारायणानें त्याला एक शास्त्र व ग्रंथ बनवले .

सर्व माता पितांना एकच चिंता आहे की भविष्य काळामध्ये आपले संतान मुले हे श्रेष्ठ असावीत प्रत्येक आई-वडिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुलं फक्त समजावून किंवा हानमार करून घडत नसून ते आपल्याच घरातील वर्तणुकीवर घडत असतात. आपले मुलांनी आपल्याला व्यसन करताना बघितले तर तेही त्याच पद्धतीने व्यसन करतील आपण खोटं बोललो तर ते येत्या पद्धतीने खोटं बोलतील त्यामुळे मुलांना सुधारण्यासाठी आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन व योग्य वाटचाल असेल तर आपले मुलंही त्याच पद्धतीने घडतील मुलांना योग्य मार्गदर्शन व घरातील योग्य वातावरण महत्त्वाचे असते.

मुले मंदिरात नेली तर राम कृष्ण हरीचा गजर करताना दिसतील आणि मुले हॉटेलमध्ये नेली वेसनी झालेली दिसतील त्यामुळे मुलांना नेत्यांना योग्य जागेवर योग्य ठिकाणी न्यावेळ असे आव्हान राधाकृष्ण महाराजांनी केले .

सद्गुरु किसनगिरी बाबा हे आपल्या जीवनामध्ये नेहमी आपल्या चांगलं कामावरती ठाम राहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज हे काम करत आहेत आणि धर्मकार्यावरती ठाम आहेत व त्याच पद्धतीने उत्तर अधिकारी स्वामी प्रकाश आनंद गिरीजी महाराज ही ठामपणे धर्मकार्य पुढे नेत आहेत त्यामुळे

भगवान शंकर ही मोह माया व संसार मोह माया आपल्या मंदिराच्या बाहेर ठेवले आहे आणि आपण नेमकं भगवान शंकराला तीच गोष्ट संसाराच्या संदर्भात मागतो परंतु आपण भगवान शंकराला भक्ती मागितली पाहिजे ती भक्ती शंकराला नक्की आवडेल .

रूप बिघड तर ते रक्षासत्व नसून स्वभाव बिघडला तर तो नक्कीच राक्षस बनतो त्यामुळे रूपाचं अर्थ राक्षस होत नसून स्वभाव बदलला तर नक्कीच राक्षस निर्माण होतो सद्गुरु किसनगिरी बाबाचा स्वभाव हा एकदम श्रद्धाळू होता साक्षात किसनगिरी बाबांच्या रूपामध्ये दत्त भगवंताचे दर्शन होत होते.

पंतप्रधानांनी तेल व पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचे आवाहन केले आहे परंतु कीर्तन कमी करण्याचे आवहान केले नाही त्यामुळे कथेमध्ये भरपूर प्रमाणात भजन करा .

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई एकनाथ ,नामदेव, तुकाराम, आशा भजनाचा गजर करत कथेमध्ये रंगत आली होती..

यावेळी सर्व स्रोते यांनी तसेच देवगड भक्त परिवारातील विद्यार्थी यांनी फुगडीचा आनंद घेतला तसेच भजन प्रसंगी सर्वांनी टाळ्या वाजवत मान डोलवत भजनामध्ये दंग झाले होते. तुकाराम तुकारामच्या भजनामध्ये देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज गुरुवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज ही दंग झाली होते. जिथे नामाचा गजर आला तेथे वैकुंठ आहे भगवंत असल्याने वैकुंठ बनत नाही तर भगवंता समवेत नामसकीर्तन असल्यावर वैकुंठ तयार होतो .

आपल्या घरामध्ये तुळशीचे रोपट ठेवा ते याच्यासाठीच नसून की आपले आरोग्य चांगले राहील तुळशीच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची आठवण नेहमी येत राहील यासाठी ठेवा. सकाळी पाणी टाकण्यासाठी तुळशीला जाऊ नका तर दिवसभरामध्ये अनेक वेळा तुळशी रोपा पाशी जा व पांडुरंगाने काही माझ्यासाठी संदेश पाठवला आहे का हे तुळशी मातेला विचारा निश्चितच आपण जेवढ्या वेळेस तुळशी मातेला जवळजवळ विचारतात पांडुरंगाने काही संदेश पाठवला आहे का एक दिवस नक्कीच आपल्याला तुळशी मातेच्या माध्यमातून पांडुरंगाचा संदेश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशाप्रकारे तुळशीचे महत्त्व कथेतून विशद केले.

ज्या दिवशी भगवंत तुमची आठवण काढेल त्यादिवशी सर्व काही सोडून तुम्हाला भगवंताकडे जावे लागेल पती-पत्नीमध्ये एक विचार असला पाहिजे वस्तूला व संपत्तीला बघून स्वैरसंबंध बनवू नका चांगले विचार व चांगली वागणूक बघून विवाह संबंध बनवा कर्तव्य पालन सगळ्यात मोठे सत्कर्म आहे कर्तव्य पालन करताना प्रसिद्ध मिळाली नाही तरी चालेल कर्तव्य पालन हे सर्वात संसारामधील महत्त्वाचे काम आहे.

भगवंताला प्राप्त करायचे असेल तर संतावर प्रेम करा देवाच्या भक्तावरती प्रेम करा. भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही सर्व संतजन एकत्र येतात सर्व वैष्णव जन एकत्र येऊन मिळतात तो आनंद विश्व ब्राह्मणामध्ये ही नाही त्यामुळे तुकाराम महाराजांनी संत संगती मागितली आहे.

चिंतन करणारे हृदयात सगळ्याजवळ आहे फक्त निंदा करणार सोडून द्या व आपले मन चिंतनामध्ये गुंतवा आपल्या मुखातून सुद्धा जनाबाई पांडुरंगासारखे ओव्या प्रकट होतील . राधाकृष्ण महाराज हे श्रीमद् भागवत कथा श्री विठ्ठल भक्तीरस महोत्सव प्रसंगी देवगड देवस्थान येथे बोलत होते.

देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य ह.भ. प भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज ह.भ.प.रमेशानंदगिरीजी महाराज, विश्वनाथगिरी महाराज, ह.भ.प.मारुती महाराज काळे,ह.भ.प ससे महाराज, ह.भ.प कृष्णा महाराज वाघोले,ह.भ.प अनिल महाराज ढोले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले, डॉ.अविनाश काळे,राजेश्वर मुंदडा, अरुणजी कापडिया, कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.