कृषिदूतांनी रांगोळीतून साकारली देडगाव गावाची प्रतिकृती 

आपला जिल्हा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत सोनई येथील कृषि महाविद्यालयाती कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता व कृषि कार्यानुभव अंतर्गत देडगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर या गावाला भेट दिली.
यावेळी  ग्रामपंचायत, सोसायटी, मंदिर, जिल्हा परिषद शाळा, पाणी पुरवठा स्त्रोत, अंगणवाडी, पिक-पहाणी, मातीचे प्रकार, शेतीचे क्षेत्र इ. माहिती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधून गावाचा आढावा घेतला.
कृषिदूत-निलेश घोडके , तेजस जायभाय , अथर्व मैड, उदय गाडे, अनुज जगताप, आर्यन कांबळे यांनी देडगाव येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात  रांगोळीच्या माध्यमातून गावाची प्रतिकृती नकाशाच्या स्वरूपात दर्शवली. यामध्ये गावाचा वार्षिक तक्ता, उत्पादन तक्ता, मातीचा प्रमाण तक्ता, सामाजिक नकाशा, रस्त्यांचा नकाशा, रहदारीचा नकाशा, जलकुंभ व सर्व सरकारी कार्यालये इत्यादी नकाशांचा समावेश करण्यात आला होता.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक अनुप दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. नरेंद्र दहातोंडे, डॉ. दिशा चव्हाण, विषय विशेषज्ञ डॉ. संतोष चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.