बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी देडगाव येथील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देडगाव केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख भास्कर तांबे सर होते. मान्यवरांच्या हस्ते दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर, अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाचे प्रवीण मुंगसे सर, अनिल पेटे सर, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, प्रगतशील शेतकरी चांगदेव तांबे, आकाश चेडे,
पाटीलबा कदम, जालिंदर वांढेकर, संभाजी होंडे, बबन कुटे, बाजीराव मुंगसे, संजय कोकरे, मोहन धायगुडे, प्रल्हाद मुंगसे, विद्यार्थी व पालक, कॅशियर योगेश भारती, राहुल मुंगसे, सभासद व खातेदार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी आभार मानले.


