सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे यांचा ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके मित्रमंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, कैलासनाथ मित्र मंडळाचे अरुण वांढेकर, राजेंद्र बनसोडे सर, पोलीस मित्र समितीचे शहादेव मुंगसे, राधाकिसन चेडे, पांडुरंग तांबे, देवराव मुंगसे, अरुण मुंगसे, सागर गवळी, बंडू कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.