अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक किशोर मुंगसे यांचे स्वागत 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक किशोर रामदास  मुंगसे यांचा मेजर सोमनाथ मुंगसे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मेजर सोमनाथ मुंगसे यांनी मुख्याध्यापक किशोर मुंगसे यांचे अभिनंदन करत त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विद्यार्थीकेंद्री कार्याचा गौरव केला. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाची शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी चंद्रभान कदम होते. तर पत्रकार युनूस पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सन्मानाला उत्तर देताना मुख्याध्यापक किशोर मुंगसे यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षण व शिस्त देण्याचा संकल्प व्यक्त केला.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बाळासाहेब मुंगसे, सोन्याबापू मुंगसे, ज्ञानदेव मुंगसे, सुनील मुंगसे, कुमार मुंगसे, राज पतसंस्थेचे चेअरमन संतोष टांगळ, अशोक क्षीरसागर, संदीप कुटे, विद्यालयातील शिक्षक, पर्यवेक्षक सुभाष जाधव सर, कोठूळे एस. पी, सोनवणे आर.बी, कोळेकर पी.एम, कलापुरे एस. एस, निकम वाय.एस, पंडित जे.ए मॅडम, ढगे मॅडम,  तांबे मॅडम, झिंजुर्डे मामा, नवाळे मामा, कृष्णा कोलते आदी शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर तसेच उपस्थितांनी नूतन मुख्याध्यापकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे आभार आर.बी गायकवाड सर यांनी मानले.