बालाजी देवस्थानच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब मुंगसे तर उपाध्यक्षपदी सुभाष चोपडा यांची निवड

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बालाजी देवस्थानच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड देवस्थानच्या सभागृहामध्ये पार पडली. ही निवड हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी भाऊसाहेब रामकृष्ण मुंगसे यांची तर उपाध्यक्षपदी सुभाष चोपडा व सचिवपदी ज्ञानदेव गोरक्षनाथ कदम तर खजिनदारपदी संभाजी रामभाऊ काजळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर विश्वस्तपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नवनाथ महाराज मुंगसे, चांगदेव तांबे, रामानंद मुंगसे, सुभाष मुंगसे, अशोक गांधी, अभय लुनिया, संदीप मुंगसे, संतोष कुटे, हर्षल गुगळे, दिनेश गुगळे, योगेश चेडे, छाया खंडेश्वर कोकरे, बबन देवा तांदळे, रत्नाकर तांदळे, मनोहर तांदळे, नंदकुमार तांदळे यांची निवड करण्यात आली असून नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. देवस्थानच्या विकासासाठी तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
तर याप्रसंगी शरद गरड, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी सभापती कारभारी चेडे, माजी अध्यक्ष कुंडलिक दादा कदम, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय चेडे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, चंद्रभान कदम, भाऊसाहेब सावंत, निलेश कोकरे, जनाभाऊ तांबे, शिवाजी मुंगसे, माजी चेरमन बाबासाहेब मुंगसे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, अशोक तांबे, उद्धव मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी चेरमन खंडेश्वर कोकरे, कैलासनाथ मित्र मंडळाचे राजेंद्र कदम, मच्छिंद्र कोकरे व नागरिक, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष भाऊसाहेब मुंगसे आणि उपाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी सर्वांचे आभार मानून देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष व विश्वस्तांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.