देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाने बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा व वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी बालदिंडी वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीने उत्साहात पार पडली. वृक्षदानाचे पवित्र काम मधुकर वांढेकर व अभिनेते, वृक्षमित्र शंकरराव कन्हेरकर यांनी केले. यावेळी कन्हेरकर यांनी शालेय ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गोड घोषणांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या घोषणांनी सर्व परिसर चैतन्यमय झाला. परिसरातील महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे दिंडीचे पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व विठुमाऊलीच्या आरतीने झाली. दिंडीतून निसर्ग, वृक्षारोपण, महाराष्ट्र संस्कृती याचे सविस्तर वर्णन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन साहेबराव कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते वृक्षमित्र शंकरराव कन्हेरकर, माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुटे, जेष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार युन्नुस पठाण उपस्थित होते. महादेव मुंगसे, लक्ष्मण मुंगसे, रविंद्र वांढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आजीनाथ वांढेकर यांनी सत्कार संयोजन केले. मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले. यावेळी उपस्थित कृषी अधिकारी संजय कदम, मोहन ताके, भानुदास कुटे,आजीनाथ वांढेकर, कांता हिवाळे, नितीन कदम,आकाश कदम, सागर मुंगसे, सचिन मुंगसे, नितीन जावळे, भानुदास ताके,अनिल वांढेकर, महेश शेटे, विष्णू म्हस्के, सर्जेराव मुंगसे, परिगाबाई कदम, विजयाबाई कदम,
, सिंधुबाई कदम, मुक्ताई कदम, जिजाबाई मुंगसे, सुबाबाई कदम, शोभा कदम, जयश्री कदम, अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे, अनिता शेटे, योगिता मुंगसे, कल्याणी शेटे, प्रतिक्षा कदम, तेजश्री कदम,पल्लवी कदम,मयुरी कदम,रुपाली म्हस्के,पूजा म्हस्के,प्रतिक्षा कदम,सोनाली वांढेकर,वैष्णवी कदम,मयुरी मुंगसे,अश्विनी मुंगसे,श्रद्धा मुंगसे,शैला ताके,लिलाबाई पवार आदी पालक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या भव्य दिव्य अशा दिंडी मिरवणुकीत सर्व विद्यार्थी,ग्रामस्थ व शिक्षकांनी फुगडीचा आनंद घेतला.श्री क्षेत्र रेणुकामाता मंदिर देवीवस्ती येथे दिंडीला ग्रामस्थांनी स्वादिष्ट अल्पोपहार दिला.यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.शाळेला गटशिक्षणाधिकारी भागीनाथ बडे ,केंद्रप्रमुख भास्करराव तांबे , केंद्र मुख्याध्यापक कडु सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या वृक्षदिंडीचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.