बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने बाल दिंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत गावातून दिंडी काढली. दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.याप्रसंगी आदर्श शिक्षक भाऊसाहेब सावंत यांनी सपत्नीक दिंडीचे मनोभावे पूजन करत शिक्षकांचा सन्मान केला.
बालदिंडीचे पुष्पवृष्टी करून आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करत दिंडीचे भव्य स्वागत केले. विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचे महत्त्व, संस्कार, शिस्त आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक संभाजी कडू, सहशिक्षक लाड सर, काळे मॅडम, कदम मॅडम, मुंगसे मॅडम, पवार मॅडम, जाधव मॅडम व, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
या दिंडीमध्ये केंद्रप्रमुख भास्कर तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे,
छत्रपती प्रतिष्ठानचे मच्छिंद्र मुंगसे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश चेडे, अरुण वांढेकर, पत्रकार युनूस पठाण, संदीप नांगरे सर आदी मान्यवरांनी दिंडीमध्ये हरिनामाची पावली खेळत माऊलीच्या फुगडीचा आनंद घेतला.
यावेळी विद्यार्थी महिला पुरुष यांनी पारंपरिक पद्धतीची फुगडी, राम कृष्ण हरी या चालावर भक्ती गीते असे अनेक उपक्रम यावेळेस सादर करण्यात आली.


