गोयकर वस्ती (गारमाथा) येथे अखंड हरिनाम पंचमदिनी सप्ताहाचे आयोजन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थान, गोयकर वस्ती (गारमाथा) येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट ते गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा, श्री क्षेत्र देवगड, वै. ह.भ.प. बन्सी महाराज तांबे, श्री क्षेत्र नेवासा यांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने तसेच ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे व ह.भ.प. सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हभप गुरूवर्य महंत सुरेशानंदजी महाराज शास्त्री (श्री क्षेत्र शृंगऋषिगड) यांच्या शुभहस्ते धर्मध्वजारोहणाने या सप्ताहास प्रारंभ होणार आहे.
यामध्ये दररोजचे धार्मिक कार्यक्रम असे- दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ६.३० श्रींची आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर ११ ते ३ भोजन व विश्रांती, दुपारी ३ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६ ते ६.३० श्रींची आरती आणि त्यानंतर ७ ते ९ कीर्तन सोहळा होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसाद व हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्यात दि. २३ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान दररोज कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, विविध गावांतील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती राहणार आहे. रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे (बालाजी देडगाव), सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज केसभट (वाघोली), मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. आदिनाथ महाराज आंबेकर (माणिकदौंडी) आणि बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जगले (आखतवाडे) यांचे कीर्तन होणार आहे. तसेच बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजता दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. स्वामी नित्यानंदगिरीजी महाराज, सिद्धाश्रम पिंपळवाडी शिर्डी यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर समस्त गोयकर वस्ती यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, बालाजी देडगाव भजनी मंडळ व पाचुंदा भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. समस्त गोयकर परिवार, चोपडे परिवार, काळे परिवार, देवकाते परिवार, होंडे परिवार, लोंढे, पुंड, बावधनकर, माळवदे व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे. या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.