बालाजी देडगाव (प्रतिनिधी): नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थान, गोयकर वस्ती (गायरमाथा) येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. स्वामी नित्यानंदगिरीजी महाराज, सिद्धाश्रम पिंपळवाडी शिर्डी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. त्यानंतर समस्त गोयकर वस्ती यांच्या वतीने महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात आली होती. 
हा धार्मिक सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट ते गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संजयराव लंघे, बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, सदाशिव महाराज पुंड, प्रदीप महाराज वाघमोडे, एकनाथ महाराज, कैलासनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम, भाजपचे आकाश चेडे, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख, मच्छिंद्र मुंगसे, पांडुरंग रक्ताटे महाराज,
निलेश कोकरे, नवनाथ गोयकर, कानिफ गोयकर, नवनाथ मुंगसे, हरिभाऊ गोयकर, कमळू देवा गोयकर, धुळाजी गोयकर, कैलास गोयकर, अंबादास गोयकर, नकुल गोयकर भाऊसाहेब गोयकर, अशोक चोपडे, आदिनाथ गोयकर, मनसु गोयकर, आदिक देवकाते, खंडू चोपडे, चांगदेव टकले, नवनाथ देवराव मुंगसे, मधुकर क्षिरसागर आदि उपस्थित होते. 
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ, बालाजी देडगाव भजनी मंडळ व पाचुंदा भजनी मंडळ, समस्त गोयकर परिवार, चोपडे परिवार, काळे परिवार, देवकाते परिवार, होंडे परिवार, लोंढे, पुंड, बावधनकर, माळवदे, ससाणे व वाहुरवाघ परिवार व समस्त ग्रामस्थ बालाजी देडगाव यांनी विशेष परिश्रम घेतले.

