सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेसोबत- गडाख; देडगाव येथे सांस्कृतिक भवनचे लोकार्पण

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेबरोबर आहोत, सदैव जनतेच्या सेवेत आहोत, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे शिवारात असलेल्या पावन महागणपती देवस्थान येथील सांस्कृतिक भवनाची उभारणी पूर्ण झाली असून, या भवनाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री शंकरराव गडाख आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. सुखदेव महाराज मुंगसे होते. श्री क्षेत्र पावन महागणपती देवस्थानच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक भवनासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये, तर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.  यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार सदाशिव लोखंडे, सरपंच अनिलराव घुले, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज तांबे, ह.भ.प. प्रदीप महाराज वाघमोडे, ह भ प बाबासाहेब गडकर, ह भ प सोपान महाराज होंडे,शिवसेना नेते रामदास गोल्हार, सुरेश डिके,माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के, माजी सभापती कारभारी चेडे, महालक्ष्मी हिवरेचे सरपंच भगवानराव गंगावणे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्धन कदम, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, माका गावचे सरपंच अनिलराव घुले, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, मुळा कारखान्याची संचालक एकनाथराव जगताप, संचालक लक्ष्मण आबा पांढरे, ज्ञानेश्वर कारखान्याची संचालक जनार्दन कदम, रूपचंद गायकवाड सर, चेअरमन भरत होंडे, मा. चेअरमन कडूभाऊ तांबे, माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे, महेशराजे काळे, नामदेव घोडेचोर, दत्ता पाटील मुंगसे, दिनेश गुगळे, उद्योजक शिवाजीराव उबाळे, मालोजी गटकळ,रामेश्वर गोयकर, जनाभाऊ तांबे, पांडुरंग रक्ताटे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंगसे, सलीमराजे शेख,एकनाथ भुजबळ, नवनाथ महाराज मुंगसे, महेशराजे काळे, माजी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, मल्हारी सांगळे, पत्रकार युनूस पठाण,पावन महागणपती देवस्थानचे सर्व विश्वस्त, सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवानराव गंगावणे यांनी केले तर अशोकराव मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी देडगाव, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.