नगर: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकत, श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती वितरण समारंभ – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नील लॉन्स, नगर-पुणे रोड, केडगाव बायपास, अहिल्यानगर येथे आयोजित या कार्यक्रमात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील सुमारे २००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ मिळावे, गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना बळ मिळावे, या उद्देशाने श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकी (CSR) अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास श्रीराम फायनान्स लिमिटेडचे बिझनेस हेड (BUH) मा. श्री. अंकुश अष्टपुत्रे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलुबर्मे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री. माधव सूर्यवंशी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. सौ. संध्या गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नसून कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा सकारात्मक उपयोग करून उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या दिशेने वाटचाल करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास श्रीराम फायनान्सचे वरिष्ठ अधिकारी – ZBH (मुंबई) मा. श्री. सचिन ठाकरे, ZBH (पुणे झोन) मा. श्री. संतोष भोसले, ZBH (नागपूर झोन) मा. श्री. समीर गवळी, ZCH (मुंबई झोन) मा. श्री. पलबिंदर सिंग, कमर्शियल हेड (मुंबई) मा. श्री. अजय पवार, रिस्क हेड (पुणे) मा. श्री. विक्रम सूर्यवंशी, स्टेट हेड, ZTL (पुणे) मा. श्री. विशाल गाढवे, RBH (अहमदनगर झोन) मा. श्री. सचिन वडगावकर आणि मा. श्री. शालिग्राम तुरे, RSH मा. श्री. मनोज पाटील, RCH मा. श्री. अशोक घिगे, मा. श्री. दीपक बाबळसुरे व श्रीराम फायनान्सचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर “आपल्या शिक्षणाला आणि भविष्यातील स्वप्नांना समाजाचा पाठिंबा आहे” असा आत्मविश्वास मिळाला.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना श्रीराम फायनान्स लिमिटेडकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाणार आहे.

