बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे ‘चैतन्य नागनाथ अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी लि.’ या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ उद्या मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राजहंस कॉम्प्लेक्स, तेलकुडगाव येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.
ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के (श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री क्षेत्र नेवासा) आणि माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (चेअरमन, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शंकरराव गडाख असणार आहेत. 
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीमती सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील (अध्यक्षा, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाण), माजी आमदार पांडुरंग अभंग, संभाजीराव दहातोंडे (प्रदेशाध्यक्ष, मराठा महासंघ), अॅड. देसाई भाऊसाहेब देशमुख, शंकरराव लोखंडे पाटील (मा. सभापती, पंचायत समिती, नेवासा), कारभारी जावळे (संचालक, जिल्हा सहकारी बँक), देविदास घोडेचोर (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेवासा) आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, व्हा. चेअरमन महेश चंद्रकांत काळे, संचालक हनुमंत गटकळ, गोरक्षनाथ काळे, मोहनराव शेटे, गणेश अशोक काळे, सुखदेव घाडगे, संगीता बाळासाहेब काळे, कोमल अभिजित घोडेचोर, रामदास शेलार, कृष्णा दिंडे यांनी केले आहे.

