बालाजी देडगाव (प्रतिनिधी) : तेलकुडगाव (घोडेचोर वस्ती), ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे कै. नामदेव भगवंत घोडेचोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. नामदेव भगवंत घोडेचोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेत कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. स्वामी अमृतानंद सरस्वती माताजी यांची कीर्तनसेवा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने घोडेचोर परिवाराने भावपूर्ण निमंत्रण दिले आहे. घोडेचोर कुटुंबाला मोठी वारकरी परंपरा लाभली आहे. कै. नामदेव भगवंत घोडेचोर हे खूप धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी दोन वेळेस सपत्नीक चारधाम यात्रा केली असून त्यांनी पंढरपूरची आषाढी वारी व पैठणची वारी कधीही चुकवली नाही. दररोज हरीपाठ व ग्रंथवाचन ते नियमित करत असत.
कै. नामदेव घोडेचोर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी कै. नामदेव घोडेचोर यांच्या पत्नी गं.भा. जनाबाई नामदेव घोडेचोर, मुलगा श्री. रमेश नामदेव घोडेचोर, पुतण्या श्री. बापुसाहेब तुकाराम घोडेचोर, नातू श्री. योगेश रमेश घोडेचोर व श्री. नरेंद्र रमेश घोडेचोर, श्री. संदीप जनार्धन घोडेचोर तसेच मुली सौ. मीना सुभाष कोरडे, सौ. मंगल सुरेश भराट आणि गं.भा. बेबी चंद्रभान वांढेकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

