विखे, थोरात संघर्ष कमी झाल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार: माजी मंत्री शंकरराव गडाख

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सहकार टिकवण्यासाठी विखे , थोरात एकत्र आल्याने संघर्ष कमी झाला. त्यामुळे जरी अनेकांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी त्यांच्या एकत्र येण्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. नेवासा तालुक्यातील पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात अटळ आहे. आपण त्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठिशी सदैव उभे राहू असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील चांदा येथे दिवाळीच्या निमित्ताने भव्य स्नेह मेळाव्याचे आयोजन मा ना शंकरराव गडाख मित्र मंडळ व जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक कारभारी जावळे मित्र मंडळाच्या वतीने चांदा येथील रुक्मिणी स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आले होते . त्यावेळी उपस्थित हजारो शेतकऱ्यांशी मा मंत्री शंकरराव गडाख यांनी संवाद साधताना म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात भेटण्यासाठी सर्वच नेतेमंडळी येत होती. समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी विनंती करत होती. मा खा यशवंतराव गडाख यांचे सहकारातील योगदान महत्त्वाचे आहे हे जिल्ह्याने पाहिले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे -थोरात एकत्र येतील असे कुणालाही वाटले नाही . मात्र ते एकत्र आल्यामुळे संघर्ष कमी झाला. सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना आनंद झाला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार
आहे .दुष्काळाची भयानक परिस्थिती असताना आतापर्यंत आपण पाहिले नाही असे एकाच आवर्तनात मुळा धरणाचे आठ टीएमसीच्या जवळपास पाणी खर्च झाले . त्यामुळे भविष्यात राहिलेल्या पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी नेवासा तालुक्यावर आहे . अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन केल्यास अजूनही दोन पाण्याचे नियोजन होऊ शकते . दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या तालुक्यात काय चाललंय हे समजायला तयार नाही. दुष्काळाच्या तीव्रतेवर कुणीही बोलेना. दोन आवर्तनाच नियोजन योग्य पद्धतीने केल्यास तालुक्यात दुष्काळाची दाहकता कमी होऊ शकते. २०१२ च्या दुष्काळात आपण सर्वांनी ते करून दाखवल आहे . त्यासाठी आंदोलनाची गरज असून आपण शेतकऱ्यांसाठी गप्प बसणार नाही . संघर्ष हा करावाच लागेल . पाण्याची नियोजन कसे होते .यासाठी आपण एक महिनाभर वाट पाहू जर नियोजन झाले नाही तर प्रत्येक गावागावात दिंडी काढून सामान्य लोकांसह शेतकऱ्यांमध्ये जागृतता निर्माण करून दुष्काळी परिषद घेणार आहोत शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी कितीही अडचण आली तरी संघर्षाला आपण कधीही तयार आहोत . शेतकऱ्यांना आपण कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असेही ते म्हणाले.  जिल्हा बँक जरी अडचणीत असली तरी त्या ठिकाणी कौशल्य वापरून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कसे घेता येतील यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना मा खा यशवंतराव गडाख म्हणाले,
दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांची कामधेनू असलेली आशिया खंडातील अग्रगण्य जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आपण पहिल्यांदा सर्वांना आवाहन केले . त्या आवाहनाला सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला . त्यामुळे जवळपास ८o टक्के निवडणूक ही बिनविरोध झाली . त्यातून संघर्ष ही कमी झाला . याचा मला मनस्वी आनंद वाटतो येथून पुढे तालुक्यात संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने एकत्रित येऊन काम करा .नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शंकरराव गडाख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन
जेष्ठ खा यशवंतराव गडाख यांनी केले .त्यांच्या या आवाहनाला हजारो शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात अनुमती दिली. चांदा गावातील जुनी पीढी  व तरुण एका दिलाने काम करतात यांचा आवर्जून उल्लेख मा खा यशवंतराव गडाख यांनी केला.
आशिया खंडात अग्रगण्य असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी गडाख परिवाराने मोठ्या प्रयत्नाने मला उमेदवारी दिली .मला उमेदवारी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते . मात्र कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम नेहमी गडाख परिवाराने केले आहे . त्यामुळे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी हितासाठी काम करू असे प्रतिपादन नूतन संचालक कारभारी जावळे यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले .
यावेळी मा आमदार पांडुरंग अभंग, मुळा कारखान्याचे माजी चेअरमन नानासाहेब तुवर , माजी जि. प. सदस्य विजयाताई अंबाडे ,डॉ . विनोद गुंदेचा, राजेंद्र टेमक, एन . टी. शिंदे ,एकनाथ भुजबळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख ,मा सभापती रावसाहेब कांगुणे,सभापती नंदुकुमार पाटील,भगवानराव गंगावणे,मुळाचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हा चेअरमन बाळासाहेब पाटील, मा व्हा चेअरमन कडुबाळ कर्डीले,बापूसाहेब शेटे. प्रभाकर कोलते, बाळासाहेब सोनवणे, दत्तात्रय काळे, बाळासाहेब पाटील, अशोक मंडलिक, कपूर कर्डीले, माणिकराव होंडे, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे,ऍड हिम्मत देशमुख, अमोल अभंग, बाळासाहेब भणगे, प्रसाद पटारे, बाबा घुले, मदनराव डोळे, रंगनाथ जंगले, जनार्धन जाधव, अरुण सावंत, डॉ अमृत काळे, राजेंद्र सानप, बाबासाहेब ढवाण आदीसह नेवासा तालुक्यातील विविध गावातील संस्थाचे पदाधिकारी, चेअरमन, व्हा चेअरमन, सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेवनाथ पवार यांनी केले तर आभार बाळासाहेब जावळे यांनी मानले.