बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गौरव खंडेराव तांबे याने नीट युजी २०२५ या परीक्षेत ५२६ गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता यादीत २६७९९ क्रमांकावर स्थान प्राप्त केले. गौरव याने देडगाव येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयामधून १० वीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला होता. तर बारावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त केले होते. त्याने बारावीचे शिक्षण राहाता येथील प्रितीसुधाजी जुनियर कॉलेज येथून पूर्ण केले. गौरव याने आपल्या यशाचे क्ष्रेय कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश डांगे सर, सर्व शिक्षकवर्ग, आजी, आजोबा, आई, वडील यांना दिले आहे. गौरव हा खंडेराव तांबे सर (पुणे विद्यापीठ) यांचा मुलगा आहे.
