तेलकुडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व त्रिमूर्तीच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून व ग्रामपंचायतच्या यशस्वी पाठपुराव्याने तेलकुडगावच्या सर्वांगीण विकासासाठी ६३ लाख रुपये किमतीच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शरदराव काळे यांनी अध्यक्षीय सूचना मांडून कानिफनाथ घोडेचोर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील यांनी भुषविले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमतीताई साहेबराव घाडगे यांच्या शुभहस्ते आणि उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विकासकामांचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी श्री. संजयजी लखवाल साहेब, डेप्युटी इंजिनिअर कर्डिले साहेब, सरपंच सौ लताताई सतिशराव काळे, त्रिमूर्ती प्रशासक राऊत मॅडम, ह.भ.प. अमोल महाराज घाडगे, यांच्यासह अंकुशराव काळे, बबनराव पिसोटे, प्रमोदजी गजबार सरपंच, बाबुराव काळे, संभाजी लोंढे, मच्छिंद्र मुंगसे, निलेश कोकरे, महेंद्र दारकुंडे, यांच्यासह परिसरातील व गावातील मान्यवर उपस्थित होते.
श्री सतिशराव काळे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगे पाटील यांना अभिवादन करुन आपल्या तेलकुडगावच्य सर्वांगीण विकासासाठी आमदार श्री विठ्ठलरावजी लंघे पाटील, जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील व शासनदरबारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व कागदोपत्री केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे ६३ लक्ष रूपये निधी मंजूर झाला. यामुळे गावच्या विकासामध्ये निश्चितच भर पडणार आहे. ही सर्व विकासकामे पुढीलप्रमाणे आहेत.
तेलकुडगांवच्या मुख्य दर्शनी भागातील असलेल्या .रेणुका माता मंदिर सभामंडप करणे साठी. १० लक्ष रुपये, तसेच २).भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
विकास योजनेअंतर्गत रामनगर रस्ता खडीकरण करणे. १० लक्ष, ३). ढोरजळगाव रस्ता विजपुरवठा ६ लक्ष, ४).ढोरजळगाव रस्ता खडिकरण करणे. ४ लक्ष, ५). ढोरजळगाव रस्ता काँक्रीटीकरण करणे. ४ लक्ष, ६).रामनगर येथे विजपुरवठा करणे. ५ लक्ष, ७).रामनगर येथे रस्ता खडीकरण करणे. ३ लक्ष, ८). हनुमाननगर येथे रस्ता खडीकरण करणे. ३ लक्ष, ९). हनुमान नगर येथे विजपुरवठा करणे. ३ लक्ष, १०). गावठाण विजपुरवठा करणे. ५ लक्ष, ११). समाज मंदिर दुरुस्त करणे.१ लक्ष, १२.).गावठाण काँक्रीटीकरण रस्ता करणे. ३ लक्ष, १३).रेणुकानगर येथे रस्ता खडीकरण करणे. २ लक्ष, लोकार्पण सोहळा ::
जिल्हा परिषद प्राथमिक. शाळा किचन शेड करणे – ४ लक्ष, आदि. अशा एकुण ६३ लाख रुपये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
संत महंत, शेतकरी बंधू व लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे मागील वीस वर्षाच्या जनसामान्यांच्या नेहमीच्या संपर्कामुळेच मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आपल्या नेवासा तालुक्यात व आपल्या तेलकुडगांव साठी देणार असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आमदार लंघे पाटील पुढे म्हणाले, सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, सोलर योजना, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना, ग्रामीण भागापर्यंत मजबूत रस्ते या क्षेत्रात भरीव काम आपलं शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आपलं सरकार असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आपल्याला नेवासा तालुक्यासाठी आणता येईल. सर्वांनी एकजुटीने पुढील काळात देखील सहकार्य करावे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुमतीताई साहेबराव घाडगे पाटील यांनी या सर्व विकासकामांना शुभेच्छा देऊन शाब्बासकीची थाप देऊन आपल्या तेलकुडगाला पुढेही असेच प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील रहावे.
आदरणीय साहेबांची गावाविषयीची तळमळ व प्रेम व्यक्त करून अनमोल मार्गदर्शन केले. हभप अमोल महाराज, मा.सरपंच रेवन्नाथ काळे, अंकुशराव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सतिशराव काळे सरपंच, शरदराव काळे उपसरपंच, बालकनाथ काळे मा सरपंच, एकनाथ घोडेचोर मा.उपसरपंच, श्री अशोकराव काळे मा.उपसरपंच, रेवन्नाथ काळे मा.सरपंच, मा.उपसरपंच भारत काळे, नामदेव घोडेचोर ग्रा.सदस्य, मच्छिंद्र काळे, सुर्यभान घोडेचोर, नारायण काळे, मुरलिधर काळे आप्पा, ज्ञानेश्वर काळे मा. चेअरमन, अरुण घाडगे मा.चेअरमन, बाबुराव काळे, पृथ्वीराज गटकळ, साईनाथराव काळे, प्रसाद घोडेचोर, रमेश काळे, बापू गटकळ सर, काकासाहेब काळे मा.चेअरमन, मधुकर घाडगे सर, शंकर घोडेचोर, काकासाहेब काळे मा.चेअरमन, चंद्रकांत म्हस्के चेअरमन, अर्जुन गायकवाड, आदिनाथ थोरात, सचिन काळे, दिपक घाडगे, लक्ष्मण काळे, रुपचंद गटकळ, अशोक शेटे, अरविंद घाडगे, दिपक घाडगे, शंकर गायकवाड, राजेंद्र गटकळ, राहुल काळे, रविंद्र काळे, दिगंबर काळे संचालक, विलास काळे, तुळशीराम काळे भाऊ, गोवर्धन काळे, संदीप घाडगे, सुखदेव घाडगे, संजय घोडेचोर, दत्तुराजे काळे, सोपान शेंडगे, अशोक म्हस्के, बाळासाहेब माने, विजय गुंजाळ, सुदर्शन काळे, महादेव काळे, राजेंद्र गटकळ, श्रीकांत घाडगे, किशोर घोडेचोर, छानदेव घोडेचोर, आत्माराम घोडेचोर, भागचंद काळे, भाऊसाहेब काळे, रमेश काळे, नामदेव म्हस्के, बंडूतात्या घोडेचोर, शहाराम घोडेचोर, अॅड.सचिन घोडेचोर, गौतमशेठ गुगळे, संजय घाडगे, संतोष काळे, सुनील राजहंस, सुदाम काळे, राहुल घाडगे, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, देविदास काळे, आजीनाथ काळे, कानिफनाथ घोडेचोर, राजुकाका घाडगे, विष्णू घाडगे, सुदामराव काळे, गणेश भेंडेकर, नवनाथ काळे, रामा शिंगटे, बबन जाधव, नाना काळे, गोरख म्हस्के, अर्जुन कर्डिले फटांगरे पा., योगेश उनवणे, आत्माराम काळे, भगत बबन, राजेंद्र तेलधुने, अशोक सरोदे, बाळासाहेब गटकळ, अनिल घाडगे, पातळे जगन्नाथ, बाळासाहेब घाडगे, पोपटराव सरोदे वंचित अध्यक्ष, बाबासाहेब आल्हाट, नितीन काळे, रामनाथ काळे, प्रमोद गोसावी, लहू सरोदे, सुरेश सरोदे, तुकाराम सरोदे, दिलीप सरोदे, नवनाथ साळवे, रामदास शेलार, राजेंद् साळवे, कृष्णा सरोदे, सागर सरोदे, विरेंद्र घोडेचोर, मान्यवर मंडळी, सर्व विवीध संस्था-समितीचे पदाधिकारी, सर्व मित्र मंडळी, लालपरी एस टी बस सेवेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल व शासनाच्या पाणंद रस्त्यांमध्ये
तेलकुडगांव ते निंबेनांदुर एक किलोमीटर रस्ता टाकल्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांचे आभार मानले. श्री सतिशराव काळे यांनी तेलकुडगावच्या पुढीलप्रमाणे अनेक प्रमुख मागण्या करण्यात आल्या
१) .देवी रोड १.५ किलोमीटर डांबरीकरण किंवा खडीकरण रस्ता,
२).भायगाव रोड घोडेचोर/घाडगे/म्हस्के/शेटे वस्ती खडीकरण रस्ता,
स्मशानभूमी सुशोभीकरण, तेलकुडगाव येथील पानमळा घाडगे/माने/साळवे/गटकळ) घोडेचोर वस्ती वरती सिंगल फेज अक्षय प्रकाश डीपीची तुरंत गरज, तेलकुडगाव निबेनांदूर अंतर्गत काळे/भेंडेकर/दिंडे/गटकळ वस्ती वरती सिंगल फेज अक्षय प्रकाश डीपीची तुरंत गरज, प्रधानमंत्री आवास योजनेतील भुमीहीन लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये तेलकुडगाव ते निंबेनांदूर व आखदवाडे रस्ता,करण्यसाठी वरील सर्व मागण्यांसाठी आदरणीय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आपण लक्ष घालून पुढील काळामध्ये या आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अपेक्षा व्यक्त केली. या अगोदर देखील तेलकुडगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातू विविध विकासकामांचा पाठपुरावा आपल्याकडे शासनाकडे केलेला आहे.
यावेळी समस्त ग्रामस्थ, मान्यवर, लाडक्या बहीणी अनुसूचित नवबौद्ध घटकातील सर्व बांधव, विकासकामे सुरू होत असलेल्या भागातील सर्व नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. प्रमुख पाहुणे, सर्व उपस्थित मान्यवर व समस्त ग्रामस्थंच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शरदराव काळे उपसरपंच यांनी सर्व उपस्थितांंचे आभार मानले.