बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- हिंदवी स्वराज्यासाठी जे-जे लढले, त्या सर्वांच्या आस्थेचे प्रतीक म्हणून संत, महंत मुख्य धर्माचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू नुतनवर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदवी स्वराज्य धर्म ध्वजस्तंभाचे लोकार्पण व धर्मसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री क्षेत्र तेलकुडगाव येथे ३० मार्च व ३१ मार्च असे दोन दिवस या सोहळ्याचे आयोजन सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थांनी केले आहे. याबाबत नियोजनची बैठक घेऊन जय्यत तयारी सुरू केली आहे. या धर्मकार्यात सकल हिंदू बांधव आर्थिक व श्रमदानातून सहकार्य करत आहेत.
महंत गुरूवर्य हभप भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान) यांच्या शुभ आशीर्वादाने व
महंत गुरूवर्य ह.भ.प. रामगिरीजी महाराज (श्री क्षेत्र सरला बेट) यांच्या मार्गदर्शनाने ३० मार्च रोजी सकाळी ९.०० वा. गुढीपाडवा हिंदु नुतनवर्षानिमित्त धर्मध्वज पुजन व लोकार्पण सोहळ्यासाठी गुरूवर्य ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री (श्री क्षेत्र डोंगरगण) आणि
रामायणाचार्य हभप सोमेश्वर महाराज गवळी, (वैष्णव सेवा आश्रम, ब-हाणपूर.) यांच्या उपस्थितीत सामुहिक हनुमान चालीसा होऊन गुरुवर्य ग्रामस्थांना मार्गदर्शन करतील.
धर्मध्वज व धर्मसंमेलन दुसरा मुख्य दिवस ३१मार्च रोजी सायं ५.०० वा. संत महंत मुख्य धर्माचार्यांचे आगमन होईल प्रामुख्याने
वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के (श्री क्षेत्र ज्ञानेश्वर माऊली संस्थान नेवासा.), महंत स्वामी ह.भ.प. प्रकाशानंदगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान.)
गुरुवर्य ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के (श्री.सद्गुरु जोग महाराज संस्थान आखेगाव.) ह.भ.प.सुनीलगिरीजी महाराज (श्रीराम साधना आश्रम मुकिंदपूर.), महंत रमेशानंदगिरीजी महाराज (श्री. क्षेत्र त्रिवेणीश्वर संस्थान, हंडीनिमगांव), ह.भ.प. रमेश आप्पा महाराज (श्री. क्षेत्र हनुमानटाकळी देवस्थान.), हभप भगवानजी महाराज जंगले शास्त्री (रामकृष्ण आश्रम गोणेगांव.), हभप निलेश महाराज वाणी. (वैष्णव सेवा आश्रम बऱ्हाणपूर) या धर्माचार्याचे श्री क्षेत्र तेलकुडगांवच्या पावनभुमीत आगमन व स्वागत होऊन भव्यदिव्य मिरवणूक वारकरी संप्रदाय टाळ-मृदंग भजनात वारकरी पावली खेळत सर्व महाराज मडळी, सर्व भजनी मंडळी, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व मुली-मुले, सकल हिंदू समाज व समस्त ग्रामस्थ जास्तीत जास्त भाविक मोठ्या संख्येने या धर्म सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
३१ मार्च सांयकाळी ५ वा. संत महंताच्या शुभहस्ते धर्मध्वज पुजन राजमुद्रा कोनशिला अनावरण होईल. तद्नंतर धर्ममंडपात भव्य दिव्य धर्मसंमेलनात उपस्थित सर्व संत महंत यांचे सकल हिंदू बांधवांच्या वतीने संतपुजन होईल. या धर्मसंमेलन धर्ममंडपात संत महंतांचे शुभार्शीवाद व मार्गदर्शन उपस्थित गावातील व पंचक्रोशीतील भाविकांना लाभेल. नंतर समस्त गावकरी यांच्या वतीने सायंकाळी ८:३० वा. महाप्रसाद पंगत होईल.
हिंदवी स्वराज्य धर्मध्वज आपल्या तेलकुडगांवच्या पावनभुमीत स्थापन होत असल्याने सर्व गावकरी हिंदू बांधव आनंद व्यक्त करत उस्फूर्तपणे सहकार्य करत आहेत. या धर्मकार्यात सकल हिंदू बांधव, समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशितील हिंदू धर्मप्रेमींनी मोठ्या बहुसंख्येने या धर्मकार्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सर्व महाराज मंडळी, समस्त भजनी मंडळी, चैतन्य नागनाथ देवस्थान, समस्त ग्रामस्थ, स्वंयसेवक म्हणून गावातील सर्व मित्र मंडळी, विविध मंडळे-ग्रुप, सर्व हिंदूप्रेमी यांनी केले आहे.