नगर: एकता एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित डॉ. पी.ए. इनामदार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गुरुकुल कॅम्पस तपोवन रोड, अहिल्यानगर येथे ‘बाळासाहेब गोंटला’ सभागृहाचे उद्घाटन अहिल्यानगर शहराच्या प्रथम महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर शहराचे उपमहापौर धनंजय जाधव होते.
कार्यक्रमाची सुरुवात कोनशीलाची फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे पुष्पाताई गोंटला, प्रसिद्ध उद्योजक महेश येले, लक्ष्मी वॉचचे संचालक संजीव मंचे व संचालिका व पुणे म.न.पा. माजी नगरसेविका कोमल मंचे, विणा येले, अरुण लखापती, शशिकांत जाधव, संस्थेचे अध्यक्ष एन.ए.पठाण, शाला समिती चेअरमन अनिल साळुंके, लक्ष्मीकांत गरड, देविदास डहाळे, समीर पठाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंदा झोंड, गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्या दीप्ती कराळे, महाराष्ट्र कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शुभम टेमकर आदी उपस्थित होते.
चेअरमन अनिल साळुंके यांनी विद्यालयाच्या प्रगतीबद्दल उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. कार्यक्रमाप्रसंगी अहिल्यानगर शहराच्या प्रथम महापौर ज्योतीताई गाडे यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील आठवणी सांगताना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. समाजभुषण बाळासाहेब गोंटला यांच्या नावाने उभारलेले हे सभागृह भविष्यात अनेक उत्तम वक्ते, कलाकार आणि खेळाडू घडविण्याचे केंद्र ठरेल. विद्यालयाने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
अहिल्यानगर शहराचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या प्रगतीत भौतिक सुविधांचा वाटा मोठा असतो. विद्यालयाला कोणतेही सहकार्य करण्यास मी सदैव तत्पर असेल. हे आधुनिक सभागृह केवळ सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केले व आपल्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका वैशाली कर्डिले यांनी केले. तर अध्यक्षीय सूचना सना शेख यांनी मांडली. त्यास सरोज धाडीवाल यांनी अनुमोदन दिले. त्याचप्रमाणे शितल रहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा शिंदे, सबा शेख, प्रियंका बोरुडे, अमोल निमसे, अभिजित गवारे, सबिहा शेख, सानिया शेख, सविता शेळके, ममता कोरी, राधा चौधरी, अक्षय बोरुडे, योगिता मोहिते, अनिता कुमावत, श्रीजी विश्वनाथन, सना शेख, सलमान पठाण, आसिफ पठाण, ज्योती मुर्तडकर, विमल पोतखुले यांनी विशेष परिश्रम घेतले.


