बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे गुरुवारी ( दि. ३ एप्रिल) पीर साहेब यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवारी (2 एप्रिल) कावडी मिरवणूक होणार आहे. तर गुरुवारी यात्रा उत्सव असून या दिवशी छबिना मिरवणूक होणार आहे. तर शुक्रवारी (४ एप्रिल) हजऱ्या व जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच कारभारी कोंडीबा टकले, आदिनाथ माने, भिवाजी वाघमोडे, साईनाथ माने, रुषाभाऊ होंडे, लक्ष्मण चोपडे, शिवाजी होंडे, दादा भिसे, राधाकिसन टकले, कैलास होंडे, राजधर टकले, राजधर होंडे, बापू कुदळे, भास्कर चांडे, बहिरनाथ होंडे, अशोक मारुती होंडे, सदाशिव कोकरे, विकास खरात, बंडू खरात, अंकुश खरात, संदीप माने, शंकर टकले, मोहन कोकरे, नारायण गंगावणे, देविदास टकले, हरिभाऊ होंडे, नवनाथ माने, मल्हारी चोपडे, मुक्ताजी चंद, बाबासाहेब गोफणे यांनी केले आहे.
