बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुटे वस्ती येथे महाराष्ट्र दिन, इयत्ता पहिली प्रवेशोत्सव तसेच नवागतांचे स्वागत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बन्सीतात्या कुटे होते. सुनिल गायकवाड सर यांनी महाराष्ट्र दिनाची माहिती तसेच महाराष्ट्र दिनाचा महिमा उपस्थितांना आपल्या मनोगतामधून सांगितले.ध्वजारोहना नंतर इयत्ता पहिली प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रवेशोत्सवाचे नियोजन सीमा गायकवाड मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांचे पाहिले पाऊल, तसेच विद्यार्थी स्वागत, तसेच विविध प्रकारचे स्टॉल, टेबल यात नावनोंदणी – वजन, उंची, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपुर्व तयारी असे स्टॉल मांडून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते मिठाई भरवून प्रवेश देण्यात आला. स्टॉल कामी माजी विद्यार्थी व स्वयंसेवकांची मदत झाली. 
कार्यक्रमासाठी जयहरी कुटे, सोन्याबापू कुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, ग्रामपंचायत सदस्य जालू मामा खांडे, शिक्षणतज्ञ चेअरमन ज्ञानदेव कदम, सदस्य अर्जुन घोडके, भानुदास कुटे, बन्सी खांडे, बारकु कोकरे, भाऊसाहेब कदम, श्याम घोडके, माजी विद्यार्थी अध्यक्ष राम कुटे, उपाध्यक्ष बबलू कुटे, संतोष कोकरे, भाऊराव खांडे, नवनाथ तिडके, जालु तिडके, अलका खांडे, वच्छला कुटे, अंगणवाडी सेविका जिजाबाई नांगरे आदी कुटे वस्ती येथील ग्रामस्थ बंधू व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सीमा गायकवाड मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

