बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात पार पडली. दिवसभरामध्ये सुमारे ३८३ बालकांचे लसीकरण करण्यात आले. उर्वरित बालकाचे लसीकरण मंगळवार, बुधवार व गुरुवारी घरी जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. 
सकाळी बालाजी देडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी
सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच आनंद दळवी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, हरिभाऊ मुंगसे, अरुण वांढेकर, सेवा संस्थेचे चेअरमन सागर बनसोडे, विठ्ठल क्षीरसागर, पोपट मुंगसे, विजय गोयकर नवनाथ गोयकर, सूर्यभान तांबे,
ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, पत्रकार इंनुस पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित गवळी, आरोग्य सेवक औदुंबर कणसे, आरोग्य सेविका अनिता सूर्यवंशी, आशा सेविका मिना कदम, मंदाकिनी गोफणे, सीमा कोल्हे, मुक्ता काळे लिला शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


