कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपणाने बालदिंडी उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा व वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी बालदिंडी वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीने उत्साहात पार पडली. वृक्षरोपण ग्रामस्थ, वारकरी यांचे हस्ते झाले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गोड घोषणांनी व वारकरी महिला भगिनीच्या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांच्या घोषणांनी सर्व परिसर चैतन्यमय झाला. परिसरातील महिला भगिनींनी घरोघरी उत्स्फूर्तपणे दिंडीचे पूजन केले. दिंडी कुटे वस्ती शाळेपासून सुरू होऊन ज्ञानदेव कदम चेअरमन यांच्या निवासस्थानी आल्यानंतर चेअरमन यांनी सर्व दिंडीकरी, वारकरी बंधू आणि भगिनी यांना उपवासाचे पदार्थ, केळी, वेपर्स वाटप केले. यानंतर दिंडी देडगाव गावामध्ये आली.
प्रथमतः दिंडी हनुमान मंदिरात येऊन दर्शन घेतले. यानंतर बालदिंडी महादेव मंदिरात आली. महादेवाच्या दर्शनाने सर्व तृप्त झाले. यानंतर दत्त मंदिरात दिंडी ने दर्शन घेऊन दिंडी देडगाव चे ग्रामदैवत बालाजी मंदिरात आली.
मंदिरात बालाजी देवस्थान ट्रस्टचे सचिव ज्ञानदेव कदम सर, खजिनदार संभाजी काजळे पाटील, विश्वस्त बबलू कुटे, विश्वस्त  सुभाष देवा तांदळे, अतुल देवा तांदळे, श्री हवालदार, श्री वांढेकर काका यांनी दिंडी चे स्वागत केले.
यानंतर सौ गायकवाड मॅडम यांनी बसवलेल्या माऊली ..माऊली .. विठ्ठल हे गीत कुटेवस्ती शाळेतील बाल वारकऱ्यांनी टाळाच्या गजरात उत्कृष्ट नृत्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
यानंतर फुगडी चा कार्यक्रम झाला यात बाल वारकऱ्यांसह , वस्तीवरील माता भगिनी यांची फुगडी झाली.तसेच देवस्थानचे सचिव श्री ज्ञानदेव कदम सर, खजिनदार श्री संभाजी काजळे पाटीलयांनीही फुगडीचा आनंद घेतला. तसेच कुटेवस्ती शाळेचे श्री गायकवाड सर व गायकवाड मॅडम यांची सुद्धा फुगडी झाली.
श्री गायकवाड सर यांनी उपस्थितांना भक्तीचा महिमा, शिस्त, संस्कार, आपली संस्कृती व संतांचा महिमा , भक्त पुंडलिक, यांची माहिती सांगितली व आई वडिलांच्या सेवेचे महत्व पटवून दिले.
श्री सचिव श्री ज्ञानदेव कदम सर यांनी उपस्थितांना आजचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक होणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिची ओळख व्हावी यासाठी घेतलेली दिंडी उत्कृष्ट झाली. शाळेतील दोन्ही शिक्षक श्री गायकवाड सर व गायकवाड मॅडम तसेच वस्तीवरील सर्वांचे कौतुक केले. तसेच उत्कृष्ट दिंडी झाली याबद्दल कुटेवस्ती शाळेला बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी 1001 रु चे बक्षीस दिले. व कुटेवस्ती येथिल सर्व ग्रामस्थ व शिक्षकाचे आभार व्यक्त केले. शाळेसाठी श्री सुभाष देवा, व वांढेकर काका यांनी सुद्धा बक्षीस दिले.
यानंतर श्री अण्णासाहेब संजय तांबे यांनी सर्व दिंडी साठी उपवासाचा चिवडा दिला व वारकरी बंधू, भगिनी यांचा फराळाचा कार्यक्रम झाला. यानंतर दिंडी पुन्हा कुटेवस्ती शाळेकडे मार्गस्थ झाली. श्री अंकुश कुटे यांनी वस्तीवर सर्व दिंडी साठी साबुदाणा खिचडी व चिवडा असा फराळाचा कार्यक्रम केला. दिंडी यशस्वितेचा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. दिंडीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह जालूमामा खांडे, देविदास काकडे, बाळासाहेब कुटे, बन्सी अप्पा कुटे, ज्ञानदेव कदम चेअरमन,भानुदास दादा कुटे, रामदास दादा कुटे, संतोष कुटे, योगेश कुटे, राम कुटे, अंकूश कुटे, सोन्याबापू कुटे, तुकाराम कदम, वैभव कदम, नामदेव घोडके,आदित्य कुटे, भारत खांडे, ज्ञानदेव कुटे, गोरख माळी, सुरेश कुटे, संतोष कोकरे, महादेव खांडे, बबलू कुटे, कल्याण कुटे, यशवंत कोकरे, महेश खांडे,अर्जुन घोडके, ऋषी घोडके, जालिंदर तिडके, भाऊराव खांडे, देवराव खांडे, बन्सी खांडे, सार्थक वांढेकर, कार्तिक माळी, आदित्य लाडके, सौ वच्छलाबाई नामदेव कुटे, मीराबाई काकडे, सौ उषा कुटे, ताराबाई कुटे, उमाबाई कुटे, आशा कुटे, सुशीला कुटे, भीमाबाई कदम,मीना कदम, सुनीता घोडके, कविता कदम, अलकाबाई खांडे, ताराबाई खांडे ,भामबाई खांडे, उषा खांडे, सोनाली खांडे,मीरा खांडे, लताबाई खांडे, विमल ताई घोडके, लता लाडके, लक्ष्मी लाडके, आशा कुटे, कविता हिवाळे, निकिता काकडे,अर्चना हिवाळे,सुप्रिया काकडे,मीरा बाई काकडे,मोनिका खांडे, लताबाई खांडे, सविता खांडे, मयुरी तिडके, अरुणा तिडके,
छाया कदम, वनिता कदम,मनिषा कदम, कल्याणी कदम, सोनाली कदम,लता पंडित, ललिता पंडित ,शारदा पंडित,सार्थक वांढेकर…शाळेतील दोन्ही शिक्षक श्री गायकवाड सर व गायकवाड मॅडम यांच्यासह बहुसंख्य बाल वारकरी, ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांनी दिंडीमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे माऊली, माऊली टाळ नृत्य बसवण्यासाठी सौ गायकवाड मॅडम यांनी विशेष श्रम घेतले. शाळेला गटशिक्षणाधिकारी भागीनाथ बडे साहेब ,केंद्रप्रमुख भास्करराव तांबे साहेब ,केंद्र मुख्याध्यापक कडु सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या बालदिंडीचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.