तेलकुडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना प्रमख मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. नेवासा नगरपंचायतचे नगरसेवक प्रवीण आप्पा सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलकुडगाव आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास, खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सतिशराव काळे पाटील व मुख्याध्यापक बोरूडे यांनी मनोगतातून या दोन महापुरुषांची महती सांगितली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, लोकशाहीर आणि प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला असून १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्यात ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह आणि अनेक पोवाडे लिहून वंचितांच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी साता समुद्रापार रशियामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा गायला. प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या महापुरुषांच्या जिवनचरित्राचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंबादास बोरुडे सर, सतिशराव काळे पाटील मा. सरपंच, चंद्रकांत देवढे सर, बाळासाहेब उभेदळ सर, श्री संतोष लोणारे सर, श्रीमती वैशाली भोंगे मॅडम, श्रीमती काळे मॅडम, अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका गुंफेकर मंदाताई, काळे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य संतोष सरोदे, क्लार्क कृष्णा सरोदे, सुधाकर माने, तुकाराम सरोदे, दिलीप सरोदे, अशोक सरोदे, बाबासाहेब घोडेचोर, विजय सरोदे, जगन्नाथ सरोदे, बाळासाहेब सरोदे, सागर सरोदे, नवनाथ सरोदे, ज्ञानेश्वर सरोदे, सुरेश सरोदे, विशाल सरोदे, कणगरे संजय, अविनाश सरोदे, प्रतिक सरोदे,  गणेश सरोदे, ओमकार सरोदे, संभाजी सरोदे, योगेश सरोदे, लहू सरोदे, लखन सरोदे आदी तरुण बांधव उपस्थित होते.