बालाजी देडगाव येथे उद्या तळ कोकण देवीचा यात्रा उत्सव

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव- ढोरजळगाव रस्त्यावरील मुंगसे वस्ती येथे उद्या (ता.११) तळ कोकण देवीचा यात्रा उत्सव होणार आहे. या यात्रा उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुवर्य शंकर मुंगसे यांनी केले आहे. या यात्रा उत्सवात राज्यभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रा उत्सवात सकाळी ८ ते ११ प्रसिद्ध‌ गायक सोनु साठे सह सहकलाकारांचा संगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर गुरुवर्य तुळशीराम कोकरे यांचे गुरुपूजन होणार आहे. यानंतर पोतराजाचे देवीचे गाणे होतील. यानंतर पारंपारिक गजी ढोल नृत्य होईल. तरी या सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.