बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास धर्म ध्वजारोहनाने उत्साहात प्रारंभ झाला. शनिवार दि. १२ एप्रिल ते शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ या कालावधीत पावन हनुमान मंदिर देवस्थान येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता पावन हनुमंतरायांना गंगास्नान करून अभिषेक करण्यात आला. तसेच सकाळी ७ वाजता ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या पारायण सोहळ्यासाठी ४१ भक्तगण बसले आहेत. यावेळी झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी आण्णासाहेब म्हस्के (आबा),बाळासाहेब महाराज रिंधे (मा.सरपंच), बाबासाहेब म्हस्के ( सिव्हिल इंजिनिअर), घुगरे सर, कैलास महाराज रिंधे, बापू मामा वाघमारे महाराज, संतोषराव म्हस्के (मा.सरपंच), गवळी महाराज मिरीकर, कारभारी महाराज खराडे, संभाजी महाराज वाघ, नारायण महाराज खराडे, दिगंबर दादा रिंधे, कैलास लक्ष्मण ताके,बाळासाहेब महाराज उगले, कृष्णा महाराज म्हस्के, भारत महाराज वाघमारे, वाल्मिक महाराज लांघे, दामोधर महाराज रिंधे, बाळकृष्ण महाराज रिंधे,
मारुती नारायण खराडे महाराज, भगवान मामा गवारे,
संपतराव महाराज गवारे, रामराव मामा ताके, उद्धव आण्णा रिंधे, उगले मामा, ह.भ.प.कृष्णा महाराज उगले,भाऊराव महाराज कपिले, हभप रावसाहेब बाबा खराडे, हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, प्रल्हादराव रिंधे (मा.सरपंच), हभप देविदास महाराज म्हस्के, प्रकाशभाऊ उगले, राजेंद्र पिटेकर, संभाजी सुपारे, सुमन आक्का लष्करे, बाळासाहेब ताके मेजर, भाऊ ईटकर, दिगंबर धनवटे, दत्ता टेलर, शिवाजी महाराज वाघ, मुरलीधर मामा बागडे, चंद्रकांत ताके, रामभाऊ ताके, रामदास पा.खराडे (मा.सरपंच), विठ्ठल मामा जावळे, ह.भ.प.रोहिनीताई दत्तोबा रिंधे, गुलाबराव उगले, राधाकिसन मामा बागडे
तसेच परिसरातील भाविक, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी भाविक भक्तांनी या सप्ताह काळात किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ जेऊर हैबती यांनी केले आहे.
