भरघोस लोकसहभागातून देवीवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवीवस्ती  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि भरघोस लोकसहभागातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मच्छिंद्र पाटील कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ पाटील कुटे,प्रगतशील शेतकरी चंद्रभान पाटील कदम,पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक आदिनाथ पाटील कदम तसेच शिवव्याख्याते अशोक पाटील काळे उपस्थित होते.
यावेळी STI पदावर निवड झाल्याबद्दल श्री. राजेंद्र पाटील आठरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिस्तीचे महत्त्व पटवून देत आई-वडील, भाऊ आणि संपूर्ण परिवाराचा सदैव आदर करण्याचे आवाहन केले. त्यांनी शाळेला आहुजा साऊंड सिस्टिम भेट दिली.
प्रमुख पाहुणे चंद्रभान पाटील कदम व आदिनाथ पाटील कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात मोठे होण्यासाठी आई-वडील, पत्नी व परिवाराचे महत्त्व अधोरेखित केले. परिवाराचा आदर कायम राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाळेसाठी सुमारे २० हजार रुपये किमतीची शिवसृष्टी भेट दिली. या शिवसृष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व कार्य समजून घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.
कै. मुक्ताईबाई मुरलीधर कदम यांच्या स्मरणार्थ श्री. वसंत पाटील कदम व श्री. महादेव पाटील कदम यांनी शाळेला फायबरचे शिवशिल्प भेट दिले. या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना आईच्या मायेचे व तिच्या महत्त्वाचे संस्कार दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवव्याख्याते अशोक पाटील काळे यांनी शिवचरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून जीवनात मोठे होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी शाळेच्या विकासासाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील कुटे यांनी शाळेच्या दुरुस्ती, पत्रे सुरक्षा व रंगकामासाठी आर्थिक मदत केली. तसेच आदिनाथ (बंडुभाऊ) पाटील कदम यांनी शाळा सुशोभीकरणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
या संपूर्ण कार्यक्रमाला ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत खाऊ व बक्षिसांसह तब्बल ५९ हजार ५०० रुपयांचा भरघोस लोकसहभाग लाभला.
कार्यक्रमाला प्रास्ताविक मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी तर आभार व सुत्रसंचलन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले.यावेळी मधुकर पाटील वांढेकर,हरिभाऊ पाटील मुंगसे भानुदास पाटील कुटे,विष्णू पाटील म्हस्के,भाऊसाहेब पाटील कदम,आजिनाथ पाटील वांढेकर, लक्ष्मण पाटील मुंगसे,सर्जेराव पाटील मुंगसे,योगेश पाटील मुंगसे,गणेश पाटील मुंगसे,नितीन पाटील जावळे, बबलू पाटील हिवाळे,घोडके पाटील सोमनाथ पाटील ताके, नितीन पाटील कदम, विकास पाटील कदम, विशाल पाटील कदम,अमोल पाटील ताके, प्रदीप पाटील कदम,सागर पाटील मुंगसे,मोरे पाटील,अक्षय पाटील गायकवाड तसेच महिला भगिनी सुभद्राबाई कदम,मदलसाबाई कदम, लताबाई ताके,शोभाताई कदम, जिजाबाई मुंगसे,जयश्री कदम, अनिता शेटे,मनीषा कदम,लीला पवार, कविता कदम,श्रद्धा मुंगसे,मयुरी मुंगसे,मयुरी कदम,पल्लवी कदम, रोहिणी कदम,अश्विनी कदम,प्रतीक्षा कदम,वैशाली कदम,रूपाली म्हस्के, सोनाली वांढेकर, वैष्णवी कदम आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम केवळ उत्सव न राहता शाळा विकास, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या प्रेरणेचा उपक्रम ठरला. या लोकसहभागातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि कुटुंबाचा आदर करण्याचे संस्कार मिळणार आहेत. शाळेला गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, विस्ताराधिकारी भागीनाथ बडे, केंद्रप्रमुख भास्करराव तांबे व केंद्र मुख्याध्यापक संभाजी कडू यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असते. या कार्यक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.