जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पदमपूरवाडी,(वाकोडी) शाळेत ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक तोफेच्या सलामीने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप हौशाबापू गवळी यांची निवड करण्यात आली. तर ध्वजारोहण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री बच्चू मोढवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे इंग्रजी व मराठीतून भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत वर लेझीम कवायत सादर करण्यात आले. त्यावेळी सर्व उपस्थित पालक व ग्रामस्थांनी मुलांचे कौतुक केले. लेझीम नृत्य विशेष प्रेक्षक वर्गाला भावले. त्यानंतर पालकांमधून सौ सुवर्णा वाघ यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. तसेच अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री उधार साहेब यांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना शाळेतील शिक्षक नेहमीच वाव देण्याचा प्रयत्न करतात असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच शालेय परिसर पाहून व मुलांची तयारी पाहून समाधान व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे लेझीम पथक बसवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . श्री ठाणगे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम घेतला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची कार्यक्रमाची तयारी पाहून ग्रामस्थ पालक तसेच पदाधिकारी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती कदम मॅडम यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अंकुश गोरे, श्री ज्ञानेश्वर गवळी, श्री श्रीधर गवळी , हनुमंत गवळी, श्री.सखाराम पाचारणे, सचिन गवळी आदी तसेच महिला वर्ग माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

