कुटेवस्ती प्राथमिक शाळेत विविध शालेय संसाधनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कुटेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिशन आपुलकी अंतर्गत मिळालेले वस्तू व पंचायत समिती नेवासा निधी अंतर्गत मिळालेल्या इंटर ऍक्टिव्ह बोर्ड उद्घाटन सोहळा व अनावरण सोहळा, वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रथमतः विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांवर मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत केले. यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देडगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी स्वीकारले तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनाकाका कदम,कुकाना केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री सतीश कुमार भोसले सर तसेच देडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री भास्कर जी तांबे साहेब लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सरपंच, प्रमुख पाहुणे व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते मिशन आपुलकी अंतर्गत मिळालेल्या वस्तूंचे व नेवासा पंचायत समिती निधी अंतर्गत मिळालेल्या इंटर ऍक्टिव्ह
बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर प्रास्ताविक कुटेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील गायकवाडसर यांनी केले त्यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेची झालेली प्रगती 14 पटापासून 22 पटापर्यंत वाढलेला पट तसेच विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती व विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती यामध्ये शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात याची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली व शाळेमधून तयार होणारा विद्यार्थी कसा सर्वगुणसंपन्न व अष्टपैलू तयार होईल या दृष्टीने शाळेमध्ये प्रयत्न केले जातात असे सांगितले. इंग्लिश स्पिकिंग, इंग्लिश रिडींग,वक्तृत्व हस्ताक्षर यासारखे विशेष उपक्रम घेतले जातात असे प्रास्ताविकामध्ये गायकवाड सरांनी सांगितले यानंतर कार्यक्रमासाठी ज्या दानशूर व्यक्तींनी विविध वस्तू भेट म्हणून दिल्या त्या सर्व देणगीदारांचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार,सन्मान करण्यात आला. देणगीदार खालील प्रमाणे

1)श्री कल्याण कुटे सर यांनी शाळेसाठी रुपये 30 हजार रुपयांचा संगणक दिला.
2)तसेच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री जनाकाका कदम यांनी शाळेसाठी टू इन वन पंधरा हजार रुपये किमतीचा प्रिंटर दिला.
4) श्री महेश मच्छिंद्र खांडे वॉटर फिल्टर: 11000
5) श्री शरद पवार यांनी शाळेसाठी रुपये सात हजार किमतीचे व्यासपीठ दिले .
4)श्री शिवाजी बाबासाहेब काकडे यांनी 4000रु.किमतीचा स्टॅन्डसह टेबल फॅन दिला.
5) श्री महादेवजी खांडे यांनी संगणकासाठी 5000 रु. किमतीचा टेबल दिला.
6)तसेच श्री अण्णासाहेब संजय तांबे यांनी रुपये दीड हजार किमतीची सूर्या कंपनीची गॅस शेगडी तसेच रोख पाचशे रुपये दिले.
शाळेसाठी भेट दिली.
7) तसेच श्री अर्जुन घोडके पाटील यांनी शाळेसाठी रुपये दीड हजार किमतीची सतरंजी भेट दिली.
8)श्री नितिन साळवे यांनी 1500 किमतीचे दोन पाण्याचे जार
8) तसेच श्री भाऊराव खांडे यांनी शाळेसाठी रुपये दीड हजार किमतीच्या दोन खुर्च्या तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी सचित्र बालमित्र उजळणी भेट म्हणून दिली.
9)श्री ज्ञानदेव कदम चेअरमन यांनी शाळेतील सर्व इलेक्ट्रिक व प्लबिंग चे साहित्यासह सर्व काम स्वतः पूर्ण केले. वायरिंग व प्लांबिंग खर्च : 6000 प्राप्त वस्तूंची अंदाजे किंमत: 75 ते 76000 हजार रुपये

शाळेची भौतिक प्रगती व विकासासाठी…..
1)श्री रामभाऊ दत्तात्रय कुटे यांनी रोख 5000 रुपये
देडगाव येथील शिवमंदिर बांधकामासाठी श्री मच्छिंद्र मुंगसे यांचेकडे 5000 रु देणगी दिली.

2)शाळेच्या लेटरिंग,पेंटिंग साठी श्री भाऊसाहेबजी कचरू सावंत (निवृत्त प्राथमिक शिक्षक)सर यांनी 2100 रु रोख
3) श्री अण्णासाहेब संजय तांबे यांनी 500
रोख दिले.

रोख एकूण 7600 रुपये

वस्तूंची अंदाजे किंमत 75000+ रोख 7600= मिशन आपुलकी अंतर्गत एकूण 82600 रुपये प्राप्त..

सर्व देणगीदारांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर सरपंच व प्रमुख पाहुण्यांचा सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांमधून श्री कल्याण कुटे यांनी मनोगत व्यक्त केले मनोगत मध्ये शाळेची होत असलेली प्रगती शिक्षकांचे होत असलेली उत्कृष्ट काम व शाळेसाठी प्राप्त झालेल्या सर्व वस्तू हे शाळेचे उत्कृष्ट काम चालू आहे त्यामुळेच एव्हड्या वस्तू प्राप्त झाल्या. पुढे व यापुढेही विद्यार्थ्यांची गुणवत्ता अशीच चांगली राहावी व राहील असा विश्वास व्यक्त केला.व आणखीच शिक्षकाची जबाबदारी वाढली. असे त्यांनी आपले मनोगतामध्ये व्यक्त केले. यानंतर देडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भास्कर जी तांबे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले व मनोगतामध्ये कुटे वस्ती शाळेची प्रगती उत्तम होत आहे.इयत्ता पाचवीचा वर्ग कुटेवस्तीला खूप प्रयत्नाने जोडला आहे. शाळेमध्ये 5वी वर्ग सुरू केलेला आहे याचा निश्चितच फायदा कुटे वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे व शाळेची प्रगती उत्तम होत असल्याचे आपले मनोगता मध्ये उपस्थित ग्रामस्थांना त्यांनी सांगितले. यानंतर अध्यक्ष मनोगत झाले अध्यक्ष मनोगतामध्ये श्री चंद्रकांत जी मुंगसे पाटील यांनी कुटेवस्ती शाळेची होत असलेली प्रगती व देडगाव ग्रामपंचायत देडगाव मधील सर्व शाळेसाठी भौतिक सुविधा पुरवणार आहे देडगाव मधील शाळेला इंटर ऍक्टिव्ह बोर्ड देणार आहे तसेच प्रत्येक शाळेमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले व देडगाव मधील सर्वच शाळेची प्रगती उत्कृष्ट होत आहे असे आपले मनोगत मधून व्यक्त केले तसेच
कुटेवस्ती शाळेत विद्यार्थी प्रगती, विद्यार्थी गुणवत्ता शाळेमध्ये होत असलेले विविध उपक्रम ,विद्यार्थ्यांना संस्कृती शिस्त व संस्कार याची चांगली जाणीव व जाण शाळेतील शिक्षक करून देत आहेत शाळेची चांगली गुणवत्ता होत आहे .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे .शाळेला चांगल्या भौतिक सुविधा प्राप्त होत आहेत. याबद्दल शाळेतल्या दोन्ही शिक्षकांचे श्री गायकवाड सर व गायकवाड मॅडम यांचासरपंच,प्रमुख पाहुणे व कुटेवस्ती वरील ग्रामस्थांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिल गायकवाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सीमा गायकवाड मॅडम यांनी केले.तसेच नेवासा तालुक्याचे आमदार श्री विठ्ठलरावजी लंघे साहेब यांच्या पत्नी सौ लंघे ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना वही व शैक्षणिक साहित्य वाटप मच्छिंद्र मुंगसे व प्रमुख पाहुण्यांचा हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमासाठी देडगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री चंद्रकांत मुंगसे पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे,ग्रामपंचायत सदस्य जालूमामा खांडे, कुकाना केंद्रप्रमुख श्री सतीशकुमार भोसले साहेब, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री जनार्दनकाका कदम ,देडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भास्करजी तांबे साहेब, युवा नेते मच्छिंद्र मुंगसे,ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके,युवा पत्रकार इंनुस भाई पठाण, देडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री कडू सर, जेष्ठ शिक्षक श्री भाऊसाहेबजी सावंत सर, बनसोडेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री रवी सुपेकर सर,कुटे वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास काकडे, उपाध्यक्ष नाथाभाऊ तिडके तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री राम भाऊ कुटे, तसेच कुटेवस्तीवरील श्री जय हरी कुटे, बापू कुटे,कल्याण कुटे, श्री ज्ञानदेव कदम चेअरमन महेश खांडे, महादेव खांडे, सुरेश कुटे, श्री बाबासाहेब काकडे,जालिंदर तिडके आदित्य कुटे, श्री अरुण हिवाळे, अण्णासाहेब संजय तांबे, महादेव कुटे, बबलू कुटे, संतोष कोकरे,

सौ अर्चना पवार ताई, कुटे आज्जी, शाळेतील दोन्ही शिक्षक श्री सुनिल गायकवाड सर व सीमा गायकवाड मॅडम..उपस्थित होत्या. आदी ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोड भोजन आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शाळेला गटशिक्षणाधिकारी श्री शिवाजीराव कराड साहेब साहेब ,केंद्रप्रमुख भास्करराव तांबे साहेब ,केंद्र प्रमुख सतिशकुमार भोसले सर, केंद्र मुख्याध्यापक कडु सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.या शाळेतील कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.